Mahindra Tractor Dealership 2024: महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेऊन लाखो रुपये कमवा!
Mahindra Tractor Dealership: महिंद्रा हा मागील तीस वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपल्या भारतातील नंबर १ असलेला ट्रॅक्टर ब्रँड आहे. आणि एवढेच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत सद्धा सर्वात मोठी ट्रॅक्टर बनवणारी कंपनी म्हणून महिंद्रा & महिंद्रा या कंपनीची ओळख आहे.
महिंद्रा & महिंद्राच्या वीस, तीस, चाळीस, पन्नास आणि 60+ HP चे पावर ट्रॅक्टर उपलब्ध आहे. सध्या आपण जर फक्त भारताचाच विचार केला तर महिंद्रा ट्रॅक्टरची भारतात 1 हजारपेक्षा जास्त डीलरशिप आणि 300 पेक्षा जास्त सर्व्हिस केंद्र असून त्यामध्ये वाढ होतच आहे.
जर तुम्हाला सुद्धा महिंद्रा ट्रॅक्टरची फडीलरशिप घेऊन खूप चांगल्या प्रमाणात पैसा कमावू शकता. तर मित्रानो महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत.
Mahindra Tractor Dealership घेण्यासाठी किमान किती गुंतवणूक गरजेची आहे?
- आपल्या देशात Mahindra Tractor Dealership घेण्यासाठी तुम्हाला 50 ते 60 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
- शिवाय कंपनीला सिक्युरिटी (सुरक्षा ठेव) म्हणून 8 ते 10 लाख रुपये जमा करावे लागतील. डीलरशिप घेतल्यावर तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टर बरोबरच शेती उपकरणांची विक्री आणि विक्री पश्चात सेवा प्रदान करण्याचा सुद्धा लाभ घेता येतो.
- महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्यासाठी किती जमिनीची आवश्यकता आहे.
- महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्यासाठी किती जागेची गरज लागेल हे सर्व तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. साधारणत: ट्रॅक्टरच्या डीलरशिपकरिता शोरूम, स्टोअर रूम आणि विक्रीचे क्षेत्र या पुरेश्या जागेची उपलब्धता असणे गरजेचे आहे.
- साधारणत: ट्रॅक्टरच्या शोरूमकरता एक हजार पाचशे ते दोन हजार चौरस फूट एवढ्या क्षेत्रफळाच्या जागेची आवश्यकत तर स्टोअररूमसाठी किमान पाचशे ते सातशे चौरसफूट क्षेत्रफळाची आवश्यकता असते.
- याशिवाय इतर कामांसाठी किमान दोनशे ते तीनशे चौरसफुट क्षेत्रफळाची गरज असते. म्हणजेच महिंद्रा ट्रॅक्टरची एजंसी घेण्यासाठी तुम्हाला किमान तीन ते चार हजार चौरसफूट क्षेत्रफळाची जमीन असावी.
आवश्यक कागदपत्रे
ट्रॅक्टरची एजंसी घेण्यासाठी काही वैयक्तिक आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
वैयक्तिक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे
- आधार कार्ड,
- आधार लिंक मोबाईल नंबर
- मतदार कार्ड,
- पॅन कार्ड,
- इलेक्ट्रिसिटी बिल,
- रेशन कार्ड,
- बँक खाते पासबुक,
- ईमेल आयडी,
- फोटो,
- शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे
मालमत्तेच्या कागदपत्रांची यादी
जमिनीच्या पत्यासह संपत्तीच संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, ज्यात भाडेपट्टी केलेला करार आणि इतर NOC आवश्यक असतात.
अर्ज कसा करावा?
महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्याकरता सगळ्यात पहिले महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर जावून मेक अँन इन्क्वायरी या पर्यायावर क्लिक करावे
तेथे नवीन पेज उघडल्यावर एक फॉर्म दिसेल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची विचारलेली सगळे वैयक्तिक माहिती देणे बंधनकारक राहील. अर्ज केल्यावर महिंद्रा ट्रॅक्टरची टीम स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल.
संपर्कासाठी ई–मेल : tractorcare@mahindra.com
अथवा : 1800-2100-700 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा.