PM Pik Vima Scheme 2023: राज्यात प्रधानमंत्री पीक विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप सुरू; मात्र “या” शेतकऱ्यांना नाही मिळणार पीक विम्याचा लाभ..

PM Pik Vima Scheme : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील विम्याच्या अग्रीम रक्कमेचे वाटप सुरू झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मात्र राज्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीये.

PM Pik Vima Scheme 2023

मात्र या शेतकऱ्यांना नाही मिळणार पीक विम्याची रक्कम (PM Pik Vima Scheme)

सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम पैसे मिळत असताना काही शेतकऱ्यांना मात्र पिक विमा योजनेमधून बाद करण्यात आले असून पिक विमा भरून सुद्धा राज्यातील काही शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात येणार नाही.

ज्या भागामध्ये लागोपाठ २१ दिवस पाऊस झाला नाही अशा भागातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विम्याचा PM Pik Vima Scheme लाभ देणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी e peek pahani केली नाही अशा शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार नाही.

कारण शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी (e peek pahani) केली नाही त्यांची शेतजमीन पडीक असल्याचे मानले जाते. आणि म्हणूनच अशा शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे गृहीत धरले जाते. राज्यातल्या अधिकांश जिल्ह्यांमध्ये पीकविम्याची अग्रीम रक्कम वितरीत करण्यात आली असून सर्वाधिक रक्कम बीड व लातूर जिल्ह्यांना मिळाली आहे.

राज्यात होणार एवढ्या रकमेचे वाटप (PM Pik Vima Scheme)

”राज्यामध्ये आतापर्यंत पीक विम्यापोटी 47 लाख 63 हजार रक्कम नुकसान भरपाईच्या अर्जांना मंजुरी मिळालेली असून तब्बल 1 हजार 954 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. तर आतापर्यंत 965 कोटी एवढी रक्कम वितरित सुद्धा करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.”

खरीप हंगामामधील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात 24 जिल्ह्यांकरिता अधिसूचना काढण्यात आलेली होती. त्यापैकी 12 जिल्ह्यांतल्या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कसलेही आक्षेप नसून मात्र, 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहे. सध्या राज्यस्तरावर बुलढाणा, बीड, वाशिम, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, धुळे, पुणे, अमरावती या 9 जिल्ह्यांत विमा कंपन्यांने केलेल्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु झालेली असून पुणे व अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली सुद्धा आहे.

पीक विमा लाभयार्थ्याची यादी पाहण्यासाठी क्लिक करा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये तब्बल 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी नोंदणी केली आहे, राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा दिला आहे. याकरिता एकूण 8 हजार 16 कोटी रुपये द्यावे लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे.

राज्यातील पर्जन्यमान आणि पीक पेरणी

राज्यामध्ये 31 ऑक्टोबर 2023 च्या अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस म्हणजेच 928.8 मि.मी. झाला आहे. रब्बीकरता 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणी करण्याचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झालेली सुद्धा आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पेरणी मंदावली आहे. (Latest Marathi News)

मागील वर्षी वर्षी याच वेळेस 13 लाख 50 हेक्टर पेरणी झालेली होती तर या वर्षी 15 लाख 11 हेक्टर एवढी पेरणी झालेली आहे. रब्बी हंगामामध्ये ज्वारी हे पीक महत्त्वाचे असून 17 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्य घडीला सरासरीच्या 45 % ज्वारीची पेरणी झालेली आहे. तर हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून यावर्षी 5.64 लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या 26 % पेरणी झाली आहे.

मोदी सरकार या महिलांना देत आहे 6000 रुपये, कोणाला मिळणार या योजनेचा लाभ ? जाणून घ्या हिन्दी मध्ये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!