Encroachment On Land 2023: खाजगी जमिनीवर असलेले अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर….!

Encroachment On Land : दिवसेंदिवस वाढत चालला अतिक्रमणाचा मुद्दा हा आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा महत्त्वाचा ठरत आहे. अतिक्रमणाच्या या प्रकरणांत एखाद्या व्यक्तीची मालकी असलेल्या जमिनीमध्ये दुसराच व्यक्ती अतिक्रमण करतो, आणि तो एवढ्यावरच समाधानी न राहता जमिनीवर मालकी हक्क सुद्धा बजावू लागतो

Encroachment On Land

आपण जर अतिक्रमणाची व्याख्या पाहायला गेल्यास कुठलाही कायदेशीर व्यवहार अथवा करार न करून जमीनीच्या मूळ मालकाला न सांगता एखाद्या जमिनीच्या भागावर स्वतःचा ताबा सांगणे यालाच कायदेशीर भाषेत अतिक्रमण असे म्हणतात. (Encroachment On Land)

आणि शेतीच्या बाबतीत सांगायचे झाले तर मूळ मालकाला न कळवता शेतीवर ताबा मिळवणे किंवा शेतात बांध घालणे, एखाद्याच्या ताब्यात असलेली अथवा हद्दीमधील जमिनीत बेकायदेशीररित्या बांधकाम करून त्यावर स्वतःचा हक्क सांगणे या बाबी अतिक्रमणात येतात. आजच्या लेखात आपण अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Encroachment On Land

अतिक्रमण काढण्याची जबाबदारी असते तरी कुणाची? (Encroachment On Land)

खाजगी जमिनीवर असलेले अतिक्रमण हटवायचे असल्यास ते अतिक्रमण हटवण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित जमिनीच्या मूळ मालकाची असते (Encroachment On Land). खाजगी अतिक्रमण हटवण्यासाठी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा दखल देऊ शकत नसल्याचे कायदे तज्ञांचे म्हणणे आहे.

घरबसल्या मोफत डाउनलोड करा मतदार कार्ड

मात्र सदरील बाब लोकांना माहित नसल्यामुळे मूळ जमिनीधारक अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारी कार्यालयांत अर्ज फाटे करून त्यांचा पैसा आणि वेळ खर्ची घालतात. मात्र खाजगी जमिनीवर असलेले अतिक्रमणाविरोधात कोणतीही तक्रार देऊन अतिक्रमण हटवायचे असल्यास दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे देखील कायदे तज्ञांनी स्पष्ट केले.

कशी असते अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया?

खाजगी जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलेले असल्यास त्या संबंधीची तक्रार पोलिसांत करू शकतात. मात्र लक्षात असू द्या पोलिसांकडून लगेच कारवाई करण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाहीत.

त्यामागील अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे खाजगी जमिनीवर असलेले अतिक्रमण बाब दिवाणी स्वरूपाची असल्याने याबाबतची कोणतीही कारवाई करण्याचे कासलेच अधिकार पोलिसांना नाहीत. त्यामुळे तुम्हाला दिवाणी न्यायालयांत कायदेशीररित्या दाद मागणे हा एकमेव आणि योग्य उपाय आहे. (Encroachment On Land)

Encroachment On Land

मात्र पोलिसांत केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध तक्रारीचा वापर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये पुरावा म्हणून करू शकतात. दिवाणी न्यायालयात दाद मागण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवरील मूळ मालकी हक्क सिद्ध करण्याकरिता आवश्यक असलेले मूळ कागदपत्रे आणि जमीन मोजणीचा नकाश्याबरोबरच इतर महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा लागतात.

त्यानंतर दिवाणी न्यायालयाने केलेल्या आदेशान्वये कमिशन समिती नेमून संबंधित विभागाची/जमिनीची मोजणी करण्यात येते आणि अतिक्रमण झाले आहे अथवा नाही हे या माध्यमातून सिद्ध करता येते.

न्यायालयात जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • शीर्षक डीड
 • खरेदी करार
 • उत्परिवर्तन प्रमाणपत्र
 • तुमच्या नावावर युटिलिटी बिले

तुमच्या जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी हे करा

 • लक्षात ठेवा उपचारापेक्षा प्रतिबंध करणे नेहमीच चांगले असते, म्हणून येथे तुमच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून येथे काही उपाययोजना सांगितली आहे..
  • जर तुम्ही अनिवासी भारतीय म्हणजेच NRI असाल किंवा तुमच्या मालकीच्या मालमत्तेपासून दूर राहत असल्यास कुटुंबातील सदस्याला, मित्राला अथवा नातेवाईकाला पॉवर ऑफ ॲटर्नी (PoA) द्या.
  • जमिनवर तुमच्या नावाचा बोर्ड आणि कुंपण लावा.
  • तुमच्या मालमत्तेची देखभाल करून मालमत्तेवर लक्ष ठेवू शकेल अशा एखाद्या विश्वासू व्यक्तीला कामावर ठेवा, जो नेहमी तुमच्या मालमत्तेवर लक्ष ठेवील
  • एक लहान बांधकाम करून त्यात सुरक्षारक्षक अथवा एखादा भाडेकरू ठेवा. लक्षात ठेवा तुम्ही जो भाडेकरू ठेवाल त्यासाठी योग्य कागदपत्रे बनवा, कागदपत्रे तयार बनण्यासाठी तुम्ही वकील देखील घेऊ शकता.
  • तुम्ही भाडेकरू ठेवला असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात त्याचे व्हेरिफिकेशन करून घ्या. आजकाल, काही शहरांत भाडेकरूंची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • भाडेकरू योग्य असल्याची चौकशी करा आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास तर तुम्ही जास्त काळजी घ्यायला हवी.
  • वेळोवेळी भाडेपट्टीच्या कराराचे नूतनीकरण करा.

आता मिळवा तुमच्या फायद्याच्या सर्व सरकारी योजन्नाची माहिती हिन्दी मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!