PM Home Loan Subsidy Scheme: आता घर बांधण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपयांचे कर्ज! जाणून घ्या सविस्तर!

PM Home Loan Subsidy Scheme: आजच्या काळात महागाई शिगेला पोहोचली असून, अशा वेळी शहरात राहणाऱ्या नागरिकांना स्वत:चे घर घेणे आणि घर बांधणे हे काही सोपे राहिलेले नाही, मात्र ही समस्या सोडविण्यासाठी आता भारत सरकार द्वारे पीएम गृह कर्ज अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना गृहकर्ज दिले जाणार असून त्यासोबतच सबसिडी देखील दिली जाणार आहे. जर तुम्हालाही शहरात घर बांधायचे असेल तर आजचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

PM Home Loan Subsidy Scheme
PM Home Loan Subsidy Scheme

PM Home Loan Subsidy Scheme पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 2023 मधे जाहीर केली होती. या योजनेंतर्गत शहरी नागरिकांना गृहकर्जासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली असून, याशिवाय नागरिकांना या योजनेत फारसे व्याज देण्याची गरज लागणार नाही, तसेच यामध्ये सबसिडी देखील दिली जाणार आहे.

या योजनेंतर्गत, भारत सरकारच्या पीएम गृह कर्ज सबसिडी योजनेच्या लाभार्थ्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. याशिवाय, तुम्हाला व्याजात 3 टक्के ते 6 टक्के सूट दिली जाते.

Objective of PM Home Loan Subsidy Scheme

पंतप्रधान गृह कर्ज सबसिडी योजना जाहीर करण्यामागे भारत सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे स्वतःचे कायमस्वरूपी घर असावे, आणि त्यासाठीच ही योजना राबविली जात आहे. याशिवाय, जवळपास शहरी भागातील 25 लाखांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक त्यांच स्वप्नातील घर घेऊ शकतील.

Benefits of PM Home Loan Subsidy Scheme

या योजनेअंतर्गत, भारत सरकार नागरिकांना कर्ज घेतल्यावर 3 ते 6 टक्के व्याज सवलत देखील देत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना थेट बँकिंग सुविधेद्वारे मदत करण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांना कुठेही भटकावे लागणार नाही.

या योजनेसाठी सरकार सुमारे 20 वर्षांसाठी गृहकर्जाची सुविधा देत आहे. जर एखादी व्यक्ती शहरात राहत असेल आणि त्याचे उत्पन्नही कमी असेल तर अशा वेळी त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे (PM Awas Yojana)

  • भारत सरकारकडून प्रति घर एक लाख रुपये अनुदान झोपडपट्टी पुनर्वसनासाठी दिले जाते.
  • पार्टनरशिप मधे परवडणाऱ्या घरांच्या प्रत्येक युनिटसाठी रु. 1.5 लाख रुपयांचे केंद्रीय सहाय्य आणि लाभार्थींच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घर बांधणी/विस्तार.
  • गृहकर्जावर 6.5% पर्यंत व्याज सबसिडी
  • व्याज सबसिडी 20 वर्षांच्या कमाल कर्ज कालावधीसाठी लागू असेल किंवा अर्जदाराने घेतलेल्या कर्जाच्या कालावधीसाठी लागू असेल.
  • महिलांना घरमालक किंवा सह-मालक होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी तळमजला असणे बंधनकारक आहे.
  • घरबांधणीसाठी टिकाऊ आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे बंधनकारक आहे.
  • घर/फ्लॅटची गुणवत्ता नॅशनल बिल्डिंग कोड (NBC) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.
  • घर बांधण्यापूर्वी इमारतीच्या आराखड्याला मंजुरी घेणे बंधनकारक आहे.
  • कर्जाच्या रकमेवर किंवा मालमत्तेच्या मूल्यावर मर्यादा नाही.

Eligibility for PM Home Loan Subsidy Scheme

या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले आणि उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांनाच लाभ मिळू शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीत किंवा कोणत्याही राजकीय पदावर नसावे.
ज्या उमेदवारांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे ते पुन्हा लाभ घेऊ शकत नाहीत.
पंतप्रधान गृह कर्ज सबसिडी योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकच घेऊ शकतील.

PM Home Loan Subsidy Schemeसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • राशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर इ.

PM Home Loan Subsidy Schemeसाठी अर्ज कसा करावा?

मित्रांनो, जर तुम्हाला पीएम होम लोन सबसिडी योजनेचा लाभ घ्यायची इच्छा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जरी सरकारने ही योजना सुरू करण्याची घोषणा केली असली तरीही या योजनेसाठी अर्ज करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

तुम्हाला पीएम होम लोन सबसिडी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. या योजनेसंदर्भातील अर्जाबाबत सरकारने कोणतीही माहिती जाहीर करताच, आम्ही तुम्हाला या साइटवर सर्व माहिती उपलब्ध करून देऊ.

पंतप्रधान आवास योजना, पात्रतेच्या अटी | Pradhan Mantri Awas Yojana, Eligibility

  • लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे भारतात कायमस्वरूपी घर नसावे.
  • लाभार्थी कुटुंब भारत सरकार/राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेत नसावे.
  • लाभार्थी कुटुंबाने कोणत्याही प्राथमिक कर्ज संस्थेकडून (PLI) PMAY अनुदानाचा लाभ घेऊ नये.
  • ज्या गृहकर्ज कर्जदारांनी PMAY सबसिडी घेतली होती ते कर्जाच्या कालावधीत होम लोन बॅलन्स ट्रान्सफर अंतर्गत सबसिडीवर पुन्हा दावा करू शकत नाहीत.
  • विवाहित जोडप्यासाठी, एकतर वैयक्तिक किंवा एकत्र मालकीचे, असे अनुदान पात्र असेल.
  • लाभार्थी कुटुंबांना एमआयजी इन्कम ग्रुप अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी त्यांचा आधार क्रमांक सबमिट करणे आवश्यक आहे.
  • EWS श्रेणीतील लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत संपूर्ण सहाय्य मिळेल, तर LIG आणि MIG उत्पन्न गटांतर्गत येणारे लाभार्थी PMAY 2019 अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) साठी पात्र असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!