|

PM Swanidhi Loan Scheme: आता 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत त्वरित कर्ज मिळणार, कर्ज योजना सुरू, लगेच अप्लाय करा!

PM Swanidhi Loan Scheme: मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर केलं आणि त्या दरम्यान, PM नरेंद्र मोदी यांनी देखील PM स्वानिधी योजनेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत 78 लाख पथ विक्रेत्यांना क्रेडिट देण्यात आले आहे, त्यापैकी 2.3 लाख लोकांना तिसऱ्यांदा क्रेडिट मिळाले आहे. मित्रांनो कोरोनाच्या कठीण काळानंतर, रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे छोटे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मदत म्हणून PM Swanidhi Loan Scheme सुरू करण्यात आली होती, जी आज रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. आज आपण या लेखात या योजनेबद्दल तसेच याचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

PM Swanidhi Loan Scheme
PM Swanidhi Loan Scheme

केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात, त्याच पैकी एक स्वानिधी योजना (PM Swanidhi Loan Scheme) आहे, ज्याद्वारे सामान्य व्यापारी लोकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज देण्यात येते. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि त्यासाठी कोण अर्ज करू शकतो, या सर्वांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

काय आहे PM Swanidhi Loan Scheme?

केंद्र सरकार देशातील अशा अल्पभूधारक व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, तयार किंवा लहान व्यवसाय करणाऱ्यांना अल्प कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा लाभ कोणताही लहान, या सोबतच मध्यम स्तरावरील व्यावसायिक देखील घेऊ शकतो.

पीएम स्वानिधी योजने (PM Swanidhi Loan Scheme)अंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देते. हे कर्ज तारणमुक्त आहे, म्हणजेच यासाठी विक्रेत्यांना बँकेकडे काहीही तारण ठेवण्याची गरज असणार नाही. हे कर्ज तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध असणार आहे आणि ही कर्जाची रक्कम कर्ज घेणाऱ्या 12 महिन्यांमधे परत करावी लागेल. व्यवसाय सुरू करण्यासाठी, या योजनेअंतर्गत, सुरुवातीला 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. जर हे पैसे वेळेवर परत केले गेले, तर विक्रेते कर्जाच्या दुप्पट रकमेसाठी म्हणजे 20,000 रुपयांपर्यंत कर्जासाठी पात्र होतात आणि तिसऱ्या वेळी ते 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

या योजनेचा फायदा कसा मिळवायचा | How to get the benefit of Swanidhi Scheme

विक्रेते पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकतात. यासाठी पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म बँकेत भरावा लागेल. फॉर्मसोबत आधार कार्डची एक कॉपी जोडावी लागेल. या योजनेसाठी विक्रेत्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच मोबाईल क्रमांक आणि बँक खाते असणे सुद्धा आवश्यक आहे. तुमचे कर्ज मंजूर झाल्यास, कर्जाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल.

PM Swanidhi Loan Scheme योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात ते आता आपण जाणून घेऊया.

मुख्य म्हणजे, रस्त्यावरील पथ विक्रेते आणि व्यापारी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. भाजी विक्रेत्यांप्रमाणेच, रस्त्यावरील व्यवसाय काम करणारे, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतरांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे | Features and Benefits of Pradhan Mantri Swanidhi Yojana

 • या योजनेंतर्गत मिळालेल्या कर्जावर एका वर्षासाठी कोणत्याही हमीची आवश्यकता नाही.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी कमाल रक्कम फक्त 20 हजार रुपये आहे, परंतु जर तुम्ही या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर ही कर्जाची रक्कम वाढते जाते. तसेच जे या योजनेचा लाभ घेतील त्यांना या योजनेच्या कर्जावरील आकारण्यात येणाऱ्या व्याजावर सबसिडीही उपलब्ध आहे.
 • जर तुम्ही वेळेपूर्वी या कर्जाची परतफेड केली तर त्यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही, आणि म्हणूनच ही योजना इतर योजनांपेक्षा वेगळी आहे.
 • कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीला भांडवल म्हणजेच कर्ज पुरवणे हे या योजनेचे उद्देश्य आहे.

PM Swanidhi Loan Scheme साठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन तेथे अर्ज करावा लागेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेतून अर्ज घ्यावा लागेल आणि त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर तो फॉर्म आणि कागदपत्रे जोडावी लागतील.

एकदा का तुम्ही हा फॉर्म सबमिट केला की, तुमचा फॉर्म आणि तुमच्या कामाची पडताळणी केली जाते आणि सर्वकाही योग्य आढळल्यास, तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी तुम्ही फक्त ऑफलाइन बँकांद्वारेच अर्ज करू शकता.

PM Swanidhi Loan Schemeसाठी आवश्यक कागदपत्रे | Important Documents

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेत.

 • अर्जदाराचे ओळखपत्र आणि आधार कार्ड.
 • अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती.
 • पॅन कार्ड
 • बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
 • उत्पन्नाचे स्रोत इ.
  या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

कर्जावरील सबसिडी | Subsidy on loan

जर एखाद्या अर्जदाराने या कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केली तर त्याला कर्जावरील व्याजदरावर 7% पर्यंत सबसिडी दिली जाते. त्यासोबतच, जर तुम्ही वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला त्यावर कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. PM Swanidhi Scheme

Similar Posts