Best Scheme For Startup 2024: स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय? आत्ताच “या” शासकीय योजनांची मदत घ्या; मिळत आहेत अनेक सुविधा-

Scheme For Startup : अलीकडे आपण बघत आहोत, सुशिक्षित बेरोजगारीची समस्या ही देशापुढील सर्वाधिक गंभीर समस्या आहे. नोकऱ्यांची कमतरता असल्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार तरुण वर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता बरेच शिक्षित तरुण व्यवसायांच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचा प्रयत्न करत आहेत.

Scheme For Startup

परंतु व्यवसाय करायचे म्हटले तर त्यासाठी नक्कीच पैशांची गरज भासते, त्यामुळे अनेक तरुण इच्छा असून सुद्धा पैशांच्या अभावी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. अशा तरुण वर्गाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवता यावे तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसाय स्वतःचा स्टार्ट पण नव्याने उभा करता यावा (Startup scheme in India). यासाठी प्रशासन विविध योजना राबवत आहे आणि आर्थिक दृष्ट्या युवकांना तसेच युवतींना प्रोत्साहन देत आहे.

व्यापार करण्यासाठी एका मिनिटांत मिळणार पैसे...

अशा विविध योजनांच्या माध्यमातून तरुण वर्ग स्वतःचा व्यवसाय अगदी बिनधास्तपणे सुरू करू शकतात. तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. नक्की कोणकोणत्या योजना सरकारने राबवले आहेत, ज्या योजनांचा लाभ घेऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल (Government Scheme For Startup). चला, तर या योजनांची आपण माहिती घेऊया.

या योजनांचा लाभ घेऊन तरुण वर्ग सुरू करू शकतील स्वतःचा स्टार्टअप (Scheme For Startup)

1- क्रेडिट गॅरंटी स्कीम अर्थात सीजीएसएस–

क्रेडिट गॅरंटी स्कीमच्या अंतर्गत प्रशासन स्टार्टअप कंपन्यांना जवळपास दहा कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजना अंतर्गत प्रशासन नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी, तसेच व्यापारी बँक इत्यादींच्या माध्यमातून जे काही कर्ज दिले जाते त्यावर गॅरंटी सुद्धा दिली जाते. ही गॅरंटी स्टार्टअप साठी दिली जात असून इतकेच नव्हे, तर दहा कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी देखील दिली जाते. या योजनांतर्गत स्टार्टअप कंपन्यांना अगदी बिनधास्तपणे कर्ज उपलब्ध करून घेता येईल.

2- प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्थात पीएमएमवाय–

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रेडिट गॅरंटी स्कीम योजना नव्याने राबवली जात असून या योजनेंतर्गत लघु उद्योगांना स्टार्टअप ला जवळपास दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आरबीआयच्या माध्यमातून व्यापारी बँका, एन बी एफ सी च्या माध्यमातून तसेच एम एफ आय च्या माध्यमातून कर्ज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत विविध श्रेणी प्रमाणे 50 हजार रुपयांपासून दहा लाखांपर्यंत कर्ज पात्र नागरिकांना मिळत आहे.

3- स्टार्ट अप इंडिया योजना (Scheme For Startup)–

ग्रामीण विभागातील महिला, एससी आणि एसटी प्रवर्गातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना नव्याने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता तब्बल दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. या योजनेचे महत्त्व असे आहे की या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वात प्रथम पहिले तीन वर्ष आयकर च्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे सूट मिळते.

4- राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना–

तंत्रज्ञान यासोबतच फायनान्स व मार्केटिंग यांना आधार देण्याकरिता किंवा सपोर्ट करण्यासाठी प्रशासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत विविध स्टार्टअप तसेच लघु उद्योगांना प्रोत्साहन (Scheme For Startup) दिले जात आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे या माध्यमातून आपल्याला दोन प्रकारची कर्ज सुविधा मिळत आहे. त्या कर्ज सुविधा पुढीलप्रमाणे:

  • विपणन सहाय्य योजना

तुम्हाला जर मार्केट मधील स्थान भक्कम करायचे असेल तसेच त्यामध्ये वाढ करायचे असेल तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून मिळणारी संपूर्ण कर्जाची रक्कम अगदी बिनधास्तपणे वापरू शकता. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची जाहिरात सुद्धा होत आहे आणि मार्केटिंग वाढवण्यास पूर्णपणे मदत होते.

  • क्रेडिट सहाय्य योजना

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसायासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे त्याची खरेदी करू शकता. तसेच मार्केटिंग साठी आर्थिक दृष्ट्या मदत मिळवू शकतात. Scheme For Startup

अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच या योजनांचा फायदा घेऊन तुमचा स्वतःचा नव्याने व्यवसाय उभा करू शकता.

या पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर मिळत आहे भरघोस सवलत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!