Voter List Download 2024: गावानुसार मतदान यादी आणि उमेदवारांची कुंडली अश्या प्रकारे डाउनलोड करा..

Voter List Download 2024 : तुमच्या गावाचा, शहराचा चांगला विकास होण्याकरिता चांगले उमेदवार निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या गावातल्या वॉर्डातल्या उमेदवाराची जन्म कुंडली तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येते.

Voter List Download 2024

निवडणुकीत मतदान करायचं म्हटलं तर आपल्या गावातील मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याबरोबरच तुमच्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची संपूर्ण माहिती जसं की त्याचं नाव, त्याचं शिक्षण, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे, त्याची पूर्ण संपत्ती किती आहे याची माहिती असणं आवश्यक असतं. हीच माहिती तुम्ही अगदी तुमच्या घरबसल्या पाहू शकता, जाणून घ्या कसं.

मतदार यादी कशी पाहायची? (Voter List Download 2024)

Voter List Download 2024
 • मतदार यादी पाहण्याकरिता तुम्ही ceo.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारीचे संकेतस्थळ ओपन होईल. Voter List Download 2024
 • या वेबसाईटवर उजव्या बाजूस Voter Service मध्ये Electoral Roll 2024 PDF या पर्यायावर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल.
 • ते पेज ओपन झाल्यावर तुमच्या गावातील मतदार यादी पाहण्याकरिता तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमचे विधानसभा मतदारसंघ आणि तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे.
 • नंतर कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकाण्यात दिसणारे नंबर आणि शब्द जसेच्या तसे तुम्हाला प्रविष्ट करायचे आहे.
 • त्यानंतर Open PDF या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी उघडते.
 • मतदार यादी-2024 असे या यादीचे नाव असेल. सुरुवातीला तुमचे गाव ज्या विधानसभा/लोकसभा मतदारसंघामध्ये येते त्या मतदारसंघाचे नाव, क्रमांक आणि आरक्षणाची यादी दिलेली असते. Voter List Download 2024

पीक विम्याची जिल्हानिहाय यादीत तुमचे नाव आहे कि नाही? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

 • नंतर मतदान केंद्राच्या तपशीलामध्ये मतदान केंद्राचे नाव, मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता लिहलेला असतो आणि त्याच्या नंतर मतदारांची संख्या (जसे किस महिला, पुरुष, तृतीयपंथी) या प्रकारे दिलेली असते. Voter List Download 2024
 • त्यानंतर तुमच्या गावातील/वॉर्डातील मतदारांच्या नावाची लिस्ट दिलेली असेत. त्यामध्ये मतदाराचे नाव, पती अथवा वडिलांचे नाव, मतदाराचे घर क्रमांक, मतदाराचे वय आणि लिंग याप्रमाणे माहिती लिहिलेली असते. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव सहजपणे पाहू शकता Voter List Download 2024

अशी पाहा उमेदवारांची पूर्ण कुंडली

Voter List Download 2024
 • तुम्हाला तुमच्या गावनिहाय/वॉर्डनिहाय कोणते उमेदवार आहे आणि त्यांचे प्रतिज्ञापत्र पाहण्याकरिता panchayatelection.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करा.
 • नंतर तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ ओपन होईल.
 • आता तुमची Affidavit By The Final Contesting Candidates या पर्यायावर क्लिक करा.
 • नंतर तुमच्यासमोर Search Document एक नवीन पेज ओपन होईल. आता तुम्ही Local Body यामध्ये पर्यायांपैकी ग्रामपंचायत/वार्ड हा पर्याय निवडावा. नंतर Division पर्यायामध्ये तुमचे गाव/वार्ड ज्या विभागामध्ये येतो तो विभाग निवडावा.
 • त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचा गावाचं/वार्डाचे नाव निवडावे.
 • त्याच्या नंतर Election Programe by Name या पर्यायापुढे तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर Gram Panchayat General Election -2024 या पर्यायाची निवड करायची आहे.
 • आणि सर्वात शेवटी तुम्हाला तुमच्या वॉर्डची निवड करायची आहे. समजा वॉर्ड क्रमांक 1 ची निवड केल्यावर तर त्याखाली सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

अशीच महत्वाची माहिती हिन्दीमध्ये मिळवण्यासाठी क्लिक करा

 • त्यानंतर वॉर्ड क्रमांक 1 यामधून निवडणूकीत उभे राहिलेल्या अंतिम उमेदवारांची लिस्ट म्हणजेच All Final Contesting Candidate List हा पर्याय दिसेल.
 • यात उमेदवाराचा नोंदणी नंबर, त्याचे पूर्ण नाव, त्याच्या वॉर्डाचा नाव आणि नंबर डाऊनलोड हा पर्याय असेल.
 • तुम्हाला ज्या उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करायचे आहे त्या उमेदवाराच्या नावासमोर View Affidavit या पर्यायावर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेले प्रतिज्ञापत्र उघडेल.
 • या प्रतिज्ञापत्रामध्ये त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्या व्यवसायाचा तपशील, त्याच्या मालमत्तेचा तपशील याबाबतची सविस्तर माहिती लिहलेले असते.
 • सर्वात शेवटी प्रतिज्ञापत्रामध्ये त्याच्या माहितीचा सारांश म्हणजे त्याचे वय, त्याचे शिक्षण, त्याचा व्यवसाय, त्याच्या मुलांची संख्या, त्याच्या नावावर गुन्हे आहे की नाही, त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न, त्याची स्थावर, जंगम, एकूण मालमत्ता, त्याच्या नावावर काही कर्ज असल्यास ते देखील नमूद केलेलं असतं.

अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या वॉर्डमधील उमेदवारांची नावं आणि त्यांच्याविषयीचा तपशील इथं पाहू शकता.

Similar Posts