Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024: विधवा पुनर्विवाह योजनेला सुरुवात, पुनर्विवाह केल्यास मिळणार 2 लाख रुपये?

Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024:- विधवा महिलांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच विधवांचा सन्मान वाढवण्यासाठी आपल्या देशात ही पहिलीच योजना राज्यात सुरू केली आहे. देशातील विधवांना या योजनेच्या आधारावर पुनर्विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देखील ही योजना लवकरच सुरू करू शकते. या मुख्यमंत्री विधवा विवाह योजनेचा लाभ हा फक्त महिलांना घेता येणार आहे. पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना या योजनेद्वारे 2 लाख रुपये रक्कम प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात दिले जाणार आहेत, जेणेकरून विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल.

आता या मुख्यमंत्री विधवा पुनर्विवाह योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? या योजनेसाठी ची पात्रता काय आहे? या बद्दल ची सविस्तर माहिती आज आम्ही या लेखात देणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024

विधवा पुनर्विवाह योजनेचे उद्दिष्ट | Objectives of This Yojana

राज्यातील विधवा महिलांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देऊन, अशा महिलांमधील आत्मविश्वास वाढवणे, समाजात अधिक चांगल्या चालीरीती रुजवणे आणि विधवा महिलांचे जीवन सुखकर करण्यासाठी, अशा महिलांना प्रोत्साहन देणे हा सरकारचा Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024 योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

बहुतेक विधवा महिला पुनर्विवाह करण्यास नकार देत आहेत. मात्र विधवा स्त्रिया इतर सामान्य महीलांसारखे चांगले जीवन जगू शकत नसल्यामुळे त्यांचे आयुष्य पुन्हा सुरळीत करण्यासाठी विधवा पुनर्विवाह योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. जेणेकरून अशा महिलांना समाजात सन्मानाने जीवन जगता येऊ शकणार आहे.

Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024 ची माहिती

  • योजनेचे नाव: मुख्यमंत्री विधवा पुनर्विवाह योजना
  • संबंधित विभाग: महिला बाल विकास आणि सामाजिक सुरक्षा विभाग
  • लाभार्थी: राज्यातील विधवा महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहे
  • उद्देशः विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देऊन पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन देणेप्रोत्साहन रक्कम: रु. 2 लाख
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन/ऑनलाइन
  • ऑफिशियल वेबसाईट: लवकरच सुरू करण्यात येईल.

फायदे आणि वैशिष्ट्ये | Features & Benefits of this yojana

  • राज्यातील विधवा महिलांना पुन्हा विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत सर्व विधवां महिलांना 2 लाख रुपये एवढी रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. सरकार द्वारे दिलेली ही रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा महिलांना विवाहाची नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. ही योजना महिला बालविकास व सामाजिक सुरक्षा विभाग या द्वारे राबविण्यात येत आहे.
  • आतापर्यंत राज्यातील 7 विधवा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे कारण ही योजना 6 मार्च 2024 रोजी सुरू झाली. देशातली ही पहिलीच योजना आहे जी विधवा महिलांना पुन्हा विवाह करण्यास प्रोत्साहन देते.

पात्रता | Eligibility Criteria

  • मुख्यमंत्री विधवा पुनर्विवाह या योजनेचा लाभ घेण्यासाठी, फक्त विधवा महिलाच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
  • सर्व जातींच्या विधवा महिला या मुख्यमंत्री विधवा पुनर्विवाह योजनेअंतर्गत पुनर्विवाहासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
  • सोबतच या योजनेसाठी अर्ज करणारी महिला विवाहयोग्य वयाची असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेने पुनर्विवाह प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • सोबतच विधवेला तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र देणे सुद्धा आवश्यक आहे.
  • नागरी सेवक, निवृत्ती वेतनधारक आणि आयकरदाते या वर्गवारीत येणाऱ्या विधवा महिला या योजनेसाठी पात्र नसतील.
  • विधवा महिला अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024 Important Documents

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • स्वयंघोषणा फॉर्म
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

या योजनेसाठी अर्ज कसा कराल? | How to apply for Vidhva Punarvivha Yojana?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावे लागणार आहे.
  • नंतर तुम्ही या योजनेचा अर्ज तेथील अधिकाऱ्याकडून घेऊ शकता.
  • अर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला त्यात विचारलेली सर्व माहिती अगदी व्यवस्थित आणि योग्य रीतीने भरावी लागेल.
  • पुढे तुम्हाला अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
  • आता शेवटी तुम्हाला हा अर्ज जिथून तुम्ही घेतला आहे तिथेच पुन्हा सबमिट करावा लागेल.
  • यांनतर तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल आणि सर्व काही योग्य असल्यास तुम्हाला या योजनेसाठी 2 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

लक्षात ठेवा Mukhyamantri Vidhva Punarvivha Yojana 2024 योजना फक्त झारखंड राज्यात सुरू केलेली असून झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी या योजनेचे उद्घाटन केलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!