Kunbi Caste Certificate Genealogy: कुणबी प्रमाणपत्र कढण्यासाठी आवश्यक असलेली वंशावळ काढण्याची प्रक्रिया कशी? जाणून घ्या 2 प्रकार…

Kunbi Caste Certificate Genealogy :- कोणतेही सरकारी कागदपत्रे काढण्याकरिता सर्वानाच काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असते, व संबंधित अर्ज करताना ही सर्व महत्त्वाची कागदपत्रं त्या अर्जाला जोडून भरावे लागते. जेव्हा आपल्याला जातीचा दाखला काढायचा असतो तेव्हा जातीच्या दाखल्याकरिता अर्ज करत असताना बऱ्याच कागदपत्रांबरोबरच वंशावळ सुद्धा जोडणे गरजेचे असते, वंशावळीविना कोणालाच जातीचा दाखला मिळणे शक्य नाही. त्यामुळेच वंशावळ म्हणजे नेमके काय असते आणि ती कोणत्या पद्धतीने काढू शकतो? या बद्दल महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत…

Kunbi Caste Certificate Genealogy

वंशावळ (Genealogy) म्हणजे नेमके काय असते?

सर्व साधारणत: साध्या/सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा क्रमवारपणे लिहिलेला आराखड्याला वंशावळ (Kunbi Caste Certificate Genealogy) असे म्हणतात, अथवा पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून ते सद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतचा क्रम हा ज्या स्वरूपात लिहिलेला असतो त्याला सुद्धा वंशावळ म्हणता येईल

वंशावळ (Kunbi Caste Certificate Genealogy) हे कागद जातीचा दाखला काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र मानण्यात येते. किंवा असे म्हणा ना की, वंशावळी शिवाय जातीचा दाखला निघताच नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पूर्वीच्या पिढ्यांची ओळखीचा पुरावा म्हणजेच वंशावळ होय. आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा वंशावळ लागतेच.

वंशावळ (Kunbi Caste Certificate Genealogy) कश्या प्रकारे काढण्यात येते?

वंशावळ काढण्याकरिता सर्वात पहिले तुमच्या पूर्वीच्या पिढीतल्या पहिल्यापासून ते आत्तापर्यंत अस्तित्वात असलेल्या व्यक्तींची नावे उतरत्या क्रमाने लिहिलेले असणे गरजेचे असते. म्हणजेच सर्वात पाहिले खापर पणजोबा, नंतर पणजोबा, नंतर आजोबा, नंतर आजोबांची मुलं, त्यानंतर आजोबांच्या मुलांची मुलं या पद्धतीने नावे उतरत्या क्रमाने लिहिलेले असणे गरजेचे असते.

म्हणजेच ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीच्या खापर पणजोबा पासून ते त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहिलेली असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढतो तेव्हा पूर्वजांच्या नावापुढे कुणबी लिहलेले आहे अथवा नाही याचा शोध घेतो व त्या पद्धतीने वंशावळ काढत असतो. साधारणत: निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचे कार्य हे महसूल विभागाच्या माध्यमातून केले जाते आणि याचे रेकॉर्ड तहसील कार्यालयामध्ये जुने हक्क नोंदण्यांमध्ये सुद्धा मिळते.

या बरोबरच, कोतवालाच्या दप्तरात अथवा त्याच्या बुकमध्ये जन्म-मृत्यूची नोंद वही असते, त्यात देखील आपल्या पूर्वजांची सगळी माहिती मिळू शकते. शिवाय, जुन्या काही शैक्षणिक नोंदी सुद्धा असतात त्यात सुद्धा पूर्वजांच्या जातींचा उल्लेख दिसून येतो. याद्वारे सुद्धा तुम्ही वंशावळ काढू शकतात. Kunbi Caste Certificate Genealogy

वंशावळीच्या प्रतिज्ञापत्रासाठी अर्ज

https://shorturl.at/BHMY3 या लिंकवर क्लिक करून तुम्हाला PDF स्वरुपात वंशावळ प्रतिज्ञापत्राचा अर्ज डाऊनलोड करता येईल. Kunbi Caste Certificate Genealogy

वंशावळ कशासाठी गरजेची असते?

आपण शिक्षणाकरिता जेव्हा एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायला जातो तेव्हा त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र मागण्यात येते, आणि जातीच्या प्रमाणपत्रासाठी जुने रेकॉर्ड खूप महत्त्वपूर्ण ठरते. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचा उल्लेख केलेला असायचा. शिवाय जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेटकरिता सुद्धा वंशावळ असणे आवश्यक असते. वंशावळ काढण्याची संपूर्ण जबाबदारी विचार ही अर्जदाराचीच असते.

अर्जदाराने वंशावळ स्वतःहून लिहून द्यायची असते त्यासाठी कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावापुढे अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावापुढे कुणबी नोंद आढळून आली तर त्याच्या पुढच्या सर्व पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे अगदी सहजरीत्या शक्य होते. Kunbi Caste Certificate Genealogy

घरबसल्या ७ /१२ आणि ८-अ काढण्याची संपूर्ण प्रक्रिया

जातीच्या दाखल्याकरिता वंशावळ काढण्याची प्रक्रिया

जातीच्या तुम्ही ही वंशावळ काढतात तेव्हा कुटुंबातील आजोबा ते खापर पणजोबा यांची माहिती द्यावी लागते आणि त्याबरोबरच वंशावळ काढत असताना तुमच्याकडे कोण-कोणत्या व्यक्तींचे कागदपत्रे आहेत त्याची संपूर्ण आखणी पूर्वीच करून घेणे अत्यंत गरजेचे असते.

वंशावळीतल्या ज्या व्यक्तीचे कागदपत्रे तुमच्याकडे नाही अशा व्यक्तीचे नाव वंशावळीच्या लिस्टमधून काढणे फायद्याचे ठरते, तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रावरील माहिती चुकीची असते, जर अश्या व्यक्तीचे नाव तुम्ही वंशावळमध्ये लिहले तर पुढे चालून तुम्हाला समस्या येऊ शकतात. जर का अशी परिस्थिती तुमच्यासमोर आली आणि अशा व्यक्तींचे कागदपत्रे जरी तुमच्याकडे असली तरी सुद्धा अशा व्यक्तींची नावे वंशावळमध्ये समाविष्ट करू नये. कमीत कमी व्यक्तींची नावे वंशावळीत घ्यावी नाहीतर कागदपत्रांची संख्या वाढून समस्या निर्माण होऊ शकतात.

संपूर्ण महत्वाच्या योजनेची यादी पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!