Maharashtra Ration Card List 2024: कोणत्याही गावाची रेशन कार्डची यादी Download करने झाले अगदी सोपे, अशी पहा रेशनकार्ड यादी
Maharashtra Ration Card List 2024 : रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. भारतातील असे एक सुद्धा कुटूंब नसेल ज्याचे त्याच्या कुटुंबातील रेशन कार्डवर नाव नसेल. सर्वप्रथम समाजामधील आर्थिक दुर्बल घटकांना अत्यंत कमी पैशात धान्य देण्यासाठी वापरले जाणारे रेशन कार्ड कालांतराने एक महत्वाचे ओळखपत्र म्हणून वापरण्यात येऊ लागले. आधारकार्ड हे ओळखपत्र सुरु होण्यापूर्वी रेशन कार्ड हेअत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र समजले जात असे. त्याकाळी जन्म-मृत्यूचा दाखला आणि रेशन कार्ड हे दोन्ही कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र होते.
आताच्या काळात सुद्धा सरकारची महत्वपूर्ण योजना आयुष्मान भारत कार्ड (Ayushman Bharat Card) बनवण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे, रेशन कार्ड शिवाय आयुष्मान भारत कार्ड बनूच शकत नाही.
Digital Ration Card Services
भारतीय नागरिकांना सरकारच्या सर्व सेवा सुविधा डिजिटल माध्यमातून मिळाव्यात यासाठी भारत सरकार अनेक पातळ्यावर कामे करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांना ऑनलाईन रेशन कार्ड धारकांची यादी २०२४ म्हणजेच Maharashtra Ration Card List 2024 उपलब्ध करुन दिली असून या यादीच्या सहाय्याने आता प्रत्येक नागरिकाला घरबसल्या पाहता येणार आहे की त्यांच्या जिल्ह्यात, गावात किती रेशन कार्ड धारक आहेत.
How to see Maharashtra Ration Card List 2024
तूम्हाला रेशन कार्ड यादी डाउनलोड करायची असल्यास नागरी व अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन Maharashtra Ration Card List 2024 सहज शक्य आहे. पुढील ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करुन तुम्ही रेशन कार्ड यादी पाहू शकता.
- सर्वात आधी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या लिंकवर क्लिक केल्यावर संबंधित विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- नंतर डाव्याबाजूला RATION CARDचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर कॅपचा कोड व्हेरीफाय करा
- त्यानंतर एक नवीन पोज ओपन होईल त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा, मग त्या नंतर DFSO सिलेक्ट करावे लागेल.
- मग तुमच्या रेशन कार्डचा प्रकार निवडुन view report वर क्लिक करा.
- जिल्ह्यांअंतर्गत येणाऱ्या सर्व DFSO चे नाव तुमच्या स्क्रीनवर दिसेल. Ration Card List पाहण्यासाठी DFSO या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुमचे DFSO वर क्लिक केल्यानंतर, त्याअंतर्गत येणाऱ्या राज्यातल्या सर्व TFSO ची लिस्ट दिसेल. त्यातून तुमच्या TFSO चे नाव शोधून सिलेक्ट करा.
- TFSO हा पर्याय सिलेक्ट केल्यावर त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व रेशन दुकानदारांची नावे दिसतील, त्यापैकी तुमच्या रेशन दुकानाचे नाव निवडा
- तुम्ही ज्या दुकानातून रेशन घेता त्या दुकानाचे नाव सिलेक्ट केल्यावर लगेचच तुम्हाला त्या दुकानातून धान्य घेत असलेल्या सर्व रेशन कार्ड धारकांची यादी डाउनलोड येईल.
Ration card list of which districts is available online
महाराष्ट्रात अजून सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रेशनकार्ड यादी पाहण्याची सोय सुरु झालेली नाही. परंतु खाली दिलेल्या काही जिल्ह्यातले रेशन कार्ड तुम्ही आरामात डाउनलोड करू शकतात
छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, अहमदनगर, नांदेड, बीड, पालघर, परभणी, भंडारा, पुणे, धुळे, रायगड, चंद्रपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, उस्मानाबाद, बुलढाणा, सांगली, रत्नागिरी, गोंदिया, ठाणे, गडचिरोली, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, वर्धा, हिंगोली, कोल्हापूर, वाशीम, यवतमाळ, नंदुरबार, लातूर या जिल्ह्यातील रेशन दुकानाचे नाव सिलेक्ट केल्यावर तेथून धान्य वितरीत होणाऱ्या सर्व रेशन कार्ड धारकांची यादी तुम्हाला Maharashtra Ration Card List 2024 पाहता येईल.
आता डिजिटल रेशन कार्ड उपलब्ध होणार
भारत प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा सुविधा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळेच आता आपण रेशन कार्ड सारखे महत्त्वाचे कागदपत्र देखली डिजिटल स्वरुपात मिळवू शकणार आहोत. डिजिटल रेशनकार्ड कसे मिळवायचे हे जाणून घेण्यासाठी https://www.infoindiaa.in/ration-card-apply-online/ या लिंकवर क्लिक करा.