औरंगाबादमध्ये पुन्हा दोन गटात तुंबळ हाणामारी, शहरामध्ये भीतीचं वातावरण..

५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची ओळख आता ‘क्राईम कॅपिटल’ अशी होते की काय असा प्रश्न आता उपस्थितीत होऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणवाडी परिसरामध्ये दोन गटांची मारमारीची घटना उघडकीस आली होती.

आता पुन्हा एकदा शहरातीमधील प्रियदर्शिनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ दोन गट आपसांत भिडल्याचे समोर आले आहे.

प्रियदर्शनी उद्यानासमोरील रस्त्यावर काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन गट आपापसांत भिडले. सुरुवातीला दोन युवकांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यातील एकाने त्याच्या समर्थकांना बोलावून घेतले. काही वेळात शेकडो तरुण घटनास्थळी जमा झाले. रस्त्यावरील दगड घेऊन एकमेकांना मारू लागले. तसेच दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली. एकाच बाजूचा जमाव अधिक असल्यामुळे दुचाकीवरील युवकाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात एका युवकाच डोकं फुटलं आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येताच टोळक्याने पळ काढला.

Similar Posts