Apple कंपनीच्या सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास मनाई..

मागील महिन्यात Apple कंपनीचे CEO टिम कुक यांचे निवास स्थान Apple Maps आणि Google Maps वर एक महिला टीम कुकचा पाठलाग करत असल्याचं समोर आल्यावर ब्लर करण्यात आले होते. पण तुम्हाला माहित आहे का? की असे अनेक स्थान आहेत की जे Google Maps वर बघता येत नाहीत? ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, Google ने आपल्या मॅप वरून १० पेक्षा जास्त स्थान हटवले आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही खास स्थानांबद्दल…

1. Prison de Montlucon, France:

गूगल ने २०१८ मध्ये मध्य फ्रान्समधील तुरुंगाला मॅप वरून सेन्सॉर केले. सुरक्षेच्या कारणास्तव फ्रेंच सरकारने केलेल्या विनंतीवरून हे करण्यात आले होते.

2. Moruroa, French Polynesia:

मोरुरोआ हे एक लहान बेट असून दक्षिण प्रशांत महासागरामध्ये आहे. त्यावर गूगल मॅप मध्ये दाखवण्यास बंदी का घातली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या बेटाचा अण्वस्त्र इतिहास असल्याची माहिती मिळाली आहे.

3. 2207 Seymour Avenue, Ohio:

एरियल कॅस्ट्रो नामक एका व्यक्तीने २००२ ते २००४ या काळात काही मुलींचे अपहरण करून त्यांना ओहियो येथील घरात मे २०१३ पर्यंत ओलीस ठेवले होते. गुगल मॅपवर या जागेवर बंदी घालण्यात आली आहे.

4. House in Stockton-on-Tees:

यूकेमधील प्रिन्सपोर्ट रोडवर स्थित, स्टॉकटन•ऑन•टीज हे Google वर अस्पष्ट आहे.

5. Jeannette Island, Russia:

हे बर्फा ने आच्छादित बेट १.२ मैल लांबीचे असून असे मानले जाते की रशिया आणि अमेरिका यांच्या आपसातील तणावामुळे हे बेट गुगल मॅपवर ब्लर करण्यात आले आहे.

7. Amchitka Island :

अलास्का: अम्चिटका बेटावर ५०, ६० आणि ७० च्या दशकामध्ये अमेरिकेची अनु चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे Google मॅपवर त्यातील अनेक भाग ब्लर करण्यात आले. अमेरिकेने येथे अनेक भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत.

8. Greek military base:

ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये असलेला हा लष्करी तळ सुरक्षेच्या कारणास्तव गूगल मॅपवर संपूर्णपणे ब्लर करण्यात आला आहे.

9. French nuclear facility:

फ्रान्स देशातील AREVA ला हेग आण्विक इंधन पुनर्प्रक्रिया सुविधा देखील Google वर ब्लर आहे. ते १९७६ मध्ये उघडण्यात आले होते येथून अनेक देशांना अणुइंधन दिले जाते.

10. Polish Special Forces base:

पोलंडच्या स्पेशल फोर्सेस कमांडचे प्रशिक्षण या भागात होते. हे google वर ब्लर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!