पतीला वाचवण्यासाठी तिने घातला बिबट्याच्या जबड्यात हात अन्…!

बिबट्याने जबड्यात नवऱ्याचे डोकं घट्ट पकडलेले असताना सुद्धा तिने हारून न जाता बिबट्याशी झुंज दिली आणि नवऱ्याचे प्राण वाचवल्याची घटना पारनेर तालुक्यातल्या दरोडी चापळदरा इथं घडली असून त्या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव असून संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक 25 ला रात्री जनावरांच्या गोठ्यातून त्यांना ओरडण्याचा आवाज येत असल्याने गोरख पावडे गोठ्यात गेले असता त्यांना तेथे बिबट्या शिरल्याने जनावरं बिथरल्याचे निदर्शनास आले. गोरख तिकडे जाताच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे डोके जबड्यात पकडल्याने गोरख यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरु केला.

नवऱ्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच पत्नी संजना गोठ्याकडे धावली अन् समोरचं दृष्य बघताच ती हादरली पण तिने हिंमत सोडली नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी झुंज देत बिबट्याचे पाय आणि शेपटी ओढत त्याला मागे खेचलं, त्याचवेळी तीने बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा सुद्धा केला.

तर दुसरीकडे पावडे यांचा कुत्राही मदतीला धावला, मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. तर गोरख यांचे वडिल दशरथ यांनी बिबट्यावर दगडांचा मारा केला. सर्व बाजूने हल्ला झाल्याने बिबट्याने जबड्यातून गोरख यांना सोडत जंगलात धूम ठोकली.

पावडे कुटुंबियांनी दाखवलेल्या एक जुटीने गोरख यांचे प्राण वाचले. संजना पावडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!