औरंगाबाद शहरातील महाविद्यालयामध्ये अपहरण, गुंडशाहीचे रिवेंज वॉर सुरू..

औरंगाबाद : महाविद्यालय म्हटले की लगेचच विद्यार्थांच्या गर्दीने भरलेल्या वर्गखोल्या, कॅम्पसमधील तरुण-तरुणी, तरुण विद्यार्थी आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची कोलाहल असते. मात्र, औरंगाबादमधील महाविद्यालयातील चित्र वेगळे आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये सध्या अपहरण, गुंडगिरी, बदला अशी युद्धे सुरू आहेत. त्यामुळे मुले महाविद्यालयामध्ये भविष्य घडविण्यासाठी जातात की गुंड बनण्यासाठी? असा प्रश्न पडतो.

रिवेंजचे वॉरचा एक प्रकार 3 मे 2022 रोजी औरंगाबाद शहरात घडला आणि पहिल्यांदाच या संदर्भात एक तरुण तक्रार देण्यासाठी पुढे आला आणि रिवेंजचे वॉरच्या प्रकरणाला वाचा फुटली.

17 वर्षीय प्रज्वल दत्तात्रय कोकणे (रा. बेगमपुरा) हा युवक सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत 11वीचे शिक्षण घेत असून 3 मेला क्लास समोर 8 ते 10 युवकांनी चाकूचा धाक दाखवत प्रज्वलचे अपहरण करून मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात नेत तेथे त्याला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. घरी आल्यावर प्रज्वलन कुणाला काहीही सांगितले नाही. मात्र दोन दिवसांनी प्रज्वलच्या नाका कानातून रक्त यायला लागले. रुग्णालयात नेल्यावर प्रज्वलने पालकांना घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर तर सर्वांच्या पायाखालची जमिनच सरकली. सध्या प्रज्वलवर उपचार सुरू असून त्याच्या मेंदूवर देखील सूज आहे. रिवेंज वॉरच्या या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात प्रज्वलने तक्रार केली आहे.

रिवेंज म्हणजे नेमके काय? महाविद्यालयातील मुले रिवेंजचे वॉरच्या विळख्यात का अडकत आहेत? जाणून घ्या सविस्तर..

रिवेंज म्हणजे एक प्रकारची विकृत स्पर्धा जी विद्यार्थी समूहात सुरू असते. एका समूहाने प्रतिस्पर्धी समूहातील विद्यार्थ्याचे ट्यूशण क्लास, बाजारपेठ, कॉलेज किंवा जिथे दिसेल तिथून अपहरण करून निर्जनस्थळी आणले जाते. ज्या समूहाने अपहरण केले आहे त्या समूहातील सर्व सदस्य सर्व प्रथम अपहरण केलेल्या विद्यार्थाला अर्धनग्न करतात. व त्या नंतर त्याला खूप मारहाण केली जाते. हे प्रकरण एवढ्यावरच संपत नसून नंतर अपहरण केलेल्या मुलाकडून माफी सुद्धा मागविली जाते. आणि तो व्हिडिओ रिवेंज नावाने सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केला जातो.

एका पाठोपाठ एक असे अपहरण आणि त्या नंतर व्हिडिओ पोस्ट जणू अशी शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये चढाओढच सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक युवक या फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी असे गंभीर गुन्हे करीत आहे.

पाहा औरंगाबाद शहरातील रीवेंज वॉरचा व्हिडिओ.

रिवेंज हा एक प्रकारे संघटित गुन्हेगारीचाच प्रकार म्हणावा लागेलं. शिक्षणाच्या मंदिरात तरुण गुन्हेगारीचे धडे घेत आहे.या कडे आता पालक, महाविद्यालय प्रशासनसह पोलिसांनी देखील गांभीर्याने पाहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!