गुगलने आपल्या मॅपवर केला औरंगाबाद आणि उस्मानाबादचाच उल्लेख..!

महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ” असे नामांतर केले होते. त्यानूसार, गुगलने देखील आपल्या मॅपवर (Google Map) दोन्ही शहरांच्या नावात बदल केला होता. त्यानुसार गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव इंग्रजीमध्ये संभाजीनगर तर मराठीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव इंग्रजीमध्ये धाराशिव तर मराठीत उस्मानाबाद असे नाव दिसत होते.

गुगल मॅप (Google Map) वरील नामकरणाच्या बदलाचा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध दर्शवत गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते, त्यामुळे गुगलने पुन्हा एकदा आपल्या मॅपवर औरंगाबादचे नाव पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव पुन्हा एकदा उस्मानाबाद असे केले असून असून यामुळे निर्माण झालेल्या वादावर गुगलने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!