SBI च्या ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज नाही, WhatsApp वरच मिळणार ‘या’ सुविधा..

SBI WhatsApp Banking: स्मार्टफोन आणि इंटरनेट अनेक प्रकारे आपले जीवन सोपे बनवण्याचे काम करतात. पूर्वी लोकांना बँकेत तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते, तेही बँक बॅलन्स आणि स्टेटमेंट यासारख्या छोट्या तपशीलांसाठी. आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या SBI ने अनेक उद्देशांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. यावर तुम्हाला कोणती सेवा मिळेल जाणून घ्या.

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या SBI ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर वापरकर्त्यांसाठी WhatsApp बँकिंग सेवेबद्दल माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपचा वापर मोठ्या लोकसंख्येद्वारे केला जातो. अशा परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मवर बँकिंग सेवा मिळणे वापरकर्त्यांसाठी गोष्टी सुलभ करते.

विशेषत: व्हॉट्सॲपवर बँकिंग सेवा मिळाल्याने वापरकर्त्यांना वेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर बँक बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला एटीएम किंवा बँकेत जाण्याचीही गरज भासणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर माहिती दिली आहे. वापरकर्ते व्हॉट्सॲपवर मिनी स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स यासारख्या तपशीलांमध्ये प्रवेश करू शकतात.

बँकेने दिली ही माहिती..

तुम्ही एसबीआय यूजर असाल आणि व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होतील. यूजर्स व्हॉट्सॲपवर बँक बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट तपासू शकतील. यासाठी त्यांना +919022690226 वर Hi मेसेज करावा लागेल.

नोंदणी करणे आवश्यक

● सर्व प्रथम, वापरकर्त्यांना त्यांचे खाते SBI WhatsApp बँकिंग सेवांसाठी नोंदणीकृत करावे लागेल.
● नोंदणी करण्यासाठी, वापरकर्त्यांना +917208933148 या क्रमांकावर ‘WAREG A/c No’ एसएमएस करावा लागेल. लक्षात ठेवा की हा एसएमएस तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून करायचा आहे.
● नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला +919022690226 वर Hi मॅसेज पाठवावा लागेल.

यानंतर वापरकर्त्यांना
▪️प्रिय ग्राहक,
▪️SBI Whatsapp बँकिंगसेवांमध्ये आपले स्वागत आहे!
▪️कृपया खालीलपैकी कोणत्याही पर्यायातून निवडा.

1. खात्यातील शिल्लक रक्कम तपासा
2. मिनी स्टेटमेंट
3. व्हॉट्सॲप बँकिंगमधून नोंदणी रद्द करा

असा मेसेज येईल. येथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. वापरकर्त्यांना खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि डी-रजिस्टर असे तीन पर्याय मिळतील. वापरकर्त्यांनी त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडावा.

उदाहरणार्थ:- वापरकर्त्यांनी खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी 1 आणि मिनी स्टेटमेंटसाठी 2 टाइप करावे लागेल. वापरकर्त्यांनी उत्तर देताच त्यांना त्यांच्या खात्याचे तपशील व्हॉट्सॲपवर मिळतील.

SBI वापरकर्त्यांना क्रेडिट कार्डसाठी WhatsApp आधारित सेवा मिळते. या सेवेच्या मदतीने, SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंट, थकबाकी, कार्ड पेमेंट आणि इतर पर्याय मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!