Voter Information Slip download : तुमची मतदार स्लिप घरबसल्या ऑनलाइन कशी डाउनलोड करावी? ते सुद्धा फक्त 5 मिनिटांत

Voter Information Slip download : कोणत्याही मतदाराशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती Voter Id Slip वर असते.

Voter Information Slip

Voter Information Slip म्हणजे काय?

Voter Information Slip ही सर्व मतदारांना मतदान करणे सोपे व्हावे म्हणून ECI अर्थातच भारतीय निवडणूक आयोगातर्फे जारी करण्यात येते. या Voter Id Slip वर मतदाराचे नाव, त्याचे वय, लिंग बरोबरच तो कोणत्या विधानसभा अथवा लोकसभा मतदारसंघातील आहे याची सविस्तर माहिती मिळते. याशिवाय, मतदार स्लिपवर QR कोडची सुविधा असते, ज्याच्या सहाय्याने मतदाराची पडताळणी करने सहज शक्य होते.

कोणत्याही निवडणुकीपूर्वी या Voter Slip ECI द्वारे छापणे सुरू करण्यात येते आणि BLO द्वारे मतदाराला वितरित केली जाते. पण जर का तुम्हाला Slip मिळाली नसेल तर तुम्ही ती ऑनलाइन सुद्धा तपासू शकता. या लेखात दिलेल्या सोप्या आणि सरळ स्टेप्स फॉलो करून तुमचा VIS म्हणजेच Voter Information Slip तपासून डाउनलोड देखील करू शकता.

वेबसाइटवरून Voter Information Slip कशी डाउनलोड करावी?

  • तुम्हाला सर्वप्रथम https://voters.eci.gov.in/ वर जावे लागेल, येथे तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा.
  • लॉगिन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड आणि OTP देखील आवश्यक आहे.
  • जर तुम्ही या साइटला पहिल्यांदा भेट दिली असेल तर तुम्ही येथे नोंदणी करता येईल.
  • नोंदणी केल्यावर तुम्हाला E-Epic Download वर क्लिक करावे लागेल.यानंतर तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक देखील टाकावा लागेल, तो तुम्हाला वोटर ID वर मिळेल.ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही E-Epic सोबत VIS देखील डाउनलोड करता येईल.

मोबाईल ॲप वापरून Voter Information Slip (VIS) कशी डाउनलोड करावी?

  • यासाठी सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस फोनवर व्होटर हेल्पलाइन ॲप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुम्हाला E-Epic डाउनलोड पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या मदतीने पासवर्ड किंवा OTP द्वारे लॉग इन करावे लागेल.
  • जर तुम्ही आधीच रजिस्टर्ड केले असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि, जर नसेल तर तुम्हाला प्रथम या ॲपमध्ये नोंदणी करावी लागेल.
  • यानंतर, तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रावर दिसणारा Epic Number इथे टाकावा लागेल किंवा तुम्ही तुमच्या Application Reference Number च्या मदतीने तुमचा VIC देखील शोधू शकता.
  • सर्वात शेवटी तुमच्या स्लिपचे तपशील बघू शकता. यासह तुम्हाला ही स्लिप डाउनलोड करण्याचे पर्याय देखील मिळेल.

Similar Posts