Solar Generators 2024 : आता लाईट गेली तरीही सोलरवर चालणार टीव्ही, पंखा! जाणून घ्या कसे?
Solar Generators : मित्रांनो उन्हाच्या तीव्र झळेने नागरिक हैराण झाले आहेत आणि उन्हाळ्यात कधीही अचानक लाईट जाण्याने निश्चितच अनेकांना याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही अशा लोकांपैकीच एक असाल ज्यांच्या घरात वारंवार लाईट जाण्याची समस्या निर्माण होते, तर मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची लाईट जाण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होणार आहे.
वास्तविक पाहता, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला Solar Generators बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. हे सोलर जनरेटर तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरणार असून ते त्यंत स्वस्त दरात सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही हे सोलर जनरेटर अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाऊ शकता. हे पोर्टेबल जनरेटर केवळ टीव्ही, कुलर, पंखा आणि मोबाइल चार्ज करण्यासाठीच मदत करतील असं नाही तर वीकेंड, आउटिंग आणि कॅम्पिंगसाठीही तुम्हाला याचा खूप फायदा होतो.
Best Solar Generators in india
उन्हाळा असो की हिवाळा, जास्त लोडशेडींग किंवा खराब हवामानामुळे वीजपुरवठा खंडित केला जातोच. अशा परिस्थितीत, सोलर जनरेटर हा या प्रकारच्या समस्येवर एक जालीम उपाय आहे. आजच्या या लेखात आम्ही यासाठीचे काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी सुचवले आहेत. हे सोलर जनरेटर तुमच्या घरासाठी तसेच, तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर हायकिंग आणि कॅम्पिंगसाठी सुद्धा खूप फायद्याचे असणार आहे.
SARRVAD portable Solar Generators ST-500
हा सोलर पॉवर जनरेटर भारतातील सर्वोत्कृष्ट सौर जनरेटरच्या यादीतील आणखी एक प्रमुख स्पर्धक आहे आणि हा SARRVAD सोलर जनरेटर तुम्हाला अनेक पॉवर आउटपुटसह ऑफर करण्यात येतो. या पॉवर आउटपुटमधे ड्रिल मशीन, लॅपटॉप, ड्रोन, डिस्प्ले मॉनिटर्स, स्मार्ट फोन, फ्रिज, प्रोजेक्टर इत्यादींचा समावेश होतो. तसेच हे सोलर जनरेटर 140000mAh क्षमतेच्या बॅटरीसह ऑफर केले जाते आणि याद्वारे तुम्हाला फोन, टॅब्लेट, लॅपटॉप, हॉलिडे लाइट्स, पंखे, टीव्ही आणि प्रोजेक्टर सहज चार्ज आणि वापरता येऊ शकते.
जर तुम्हाला उत्तम सोलर जनरेटर हवे असेल तर हे SARRVAD सोलर जनरेटर तुमच्या घरासाठी एक योग्य पर्याय असणार आहे. या सोलर जनरेटरला एक हँडल सुद्धा देण्यात आले आहे, ज्यामुळे ते दुसरीकडे नेणे सोपे होते. हे सोलर जनरेटर 60000mAh 222Wh ची पॉवर क्षमता प्रदान करते, जे एक वेळेस चार्ज केले तर त्याने iPhone सुमारे 15 वेळा चार्ज होईल. हा सोलर जनरेटरफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, हॉलिडे लाइट, रेडिओ, मिनी फॅन आणि टीव्हीसाठी वापरला जाऊ शकतो. तसेच या SARRVAD सोलर जनरेटरची किंमत फक्त 22,000 रु. आहे
सोलर जनरेटर चे मुख्य वैशिष्ट्य
- 4 DC पोर्ट आणि 4 USB पोर्ट
- घर, कॅम्पिंग आणि हायकिंगसाठी योग्य
- एलईडी फ्लॅशलाइट आणि लिथियम-आयन बॅटरी
Anchor Portable Solar Generator
भारतात उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट सोलर जनरेटरबद्दल बोलायचे झाल्यास, अँकर सोलर जनरेटरचे नाव सुद्धा अग्रगण्य आहे. हे सोलर जनरेटर 777 वॅट्स क्षमतेसह येते आणि या सोलर जनरेटर मधे 2X 60W पॉवर डिलिव्हरी आणि LED फ्लॅश लाइट सुद्धा उपलब्ध आहे. हा सोलर जनरेटर घरासाठी तसेच कॅम्पिंगसाठी सुद्धा योग्य आहे. याची किंमत ही रु 1,29,999 इतकी असून याच्या वैशिष्ट्यांमधे, आउटपुट टॉपिंग 770W सह 2 AC आउटलेट आणि 2 USB-C पोर्टचा समावेश होतो.
Anker 300W/288Wh Solar Generator
Anker ब्रँडचा हा सौर जनरेटर पुन्हा एकदा भारतात उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट Solar Generatorsमध्ये गणला जाऊ शकतो आणि तो 110V AC आउटलेट आणि 65W USB-C पॉवरसह उपलब्ध आहे. हे सोलर जनरेटर घरासाठी तसेच कॅम्पिंग आणि रोड ट्रिपसाठी सुद्धा खूप फायद्याचे आहे.