दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत झाल्याने सणावाराच्या दिवशी प्रवाशांचे हाल..

औरंगाबाद दौलताबाद रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेमध्ये एका रुळावरून दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले असून याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा होत आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प असून पुढील 10 तास मुंबईकडे रेल्वे जाणार नाही. त्यामुळे गुढीपाडवा निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

या घटनेमुळे नांदेड ते मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली असून रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मालवाहतूक रेल्वे रुळावरुन हटवून वाहतूक सुरळित करण्यासाठी पूर्णावरून ब्रेक डाऊन व्हॅन मागवण्यात आलेली आहे.

या रेल्वेगाड्या विविध स्टेशन्सवर अडकून पडल्या आहेत.

▪️रोटेगाव- काचीगुडा पैसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर

▪️जालना -दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर

▪️निजामाबाद- पुणे पैसेंजर औरंगाबाद स्टेशनवर

▪️अमृतसर -नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर

अजूनही काळ ही रेल्वेवाहतूक ठप्प राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!