गुढीपाडव्याचा मुहूर्त कधी..? कशी उभारालं गुढी, जाणून घ्या..!

चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा उत्सव 2 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. हा सण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शुभ काळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या.

दिनांक– 2 एप्रिल 2022, शनिवार

प्रतिपदा सुरूवात – 1 एप्रिल, शुक्रवार सकाळी 11:53 वाजता.

प्रतिपदा समाप्ती – 2 एप्रिल, शनिवार रात्री 11:58 पर्यंत.

कशी उभारावी गुढी..?

गुढी उभारण्यासाठी एक काठी स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्या काठीला रेशमी वस्त्र बांधून, त्यावर चांदीचे तांब्या किंवा घरातील कोणताही तांब्या स्वच्छ करावा. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधून साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.

अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी. हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने, या गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात. त्यामुळेच ‘ब्रह्मध्वज’ची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु।।

ही प्रार्थना केल्यानंतर नवीन पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाच्या पाण्याचे सेवन करावे.. नंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना, पीकपाण्याची माहिती घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

गुढीपाडव्याचा दुर्मिळ योगायोग

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो. हा विशेष योगायोग या दिवशी घडत आहे. या दिवशी इंद्र योगासह अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. गुढीपाडव्याला इंद्र योग सकाळी ८.३१ पर्यंत आहे. त्यानंतर १ एप्रिल रोजी सकाळी १०:४० ते एप्रिल रोजी सकाळी ०६:१० पर्यंत अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे.

गुढीपाडव्याचे महत्व

देशातील अनेक भागात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. या सणाबद्दल असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि या दिवसापासून सत्ययुग सुरू झाला. या दिवशी घराबाहेर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते. यासोबतच या दिवशी घराच्या छतावर ध्वजही लावला जातो. या दिवशी देवी दुर्गा आणि भगवान राम यांची पूजा विधीपूर्वक केली जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

गुढीपाडव्याच्या दिवसाला आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी खास पदार्थ तयार केले जातात. या दिवशी रिकाम्या पोटी पुरणपोळीचे सेवन केल्याने त्वचाविकाराचा त्रासही दूर होतो, असा या सणाविषयी समज आहे. वास्तूनुसार गुढीपाडव्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. यामध्ये कडुलिंबाची पाने आणि साखरेचा वापर केला जातो. कडुनिंब म्हणजे जीवनातील कटू प्रसंग आणि मिश्री म्हणजे जीवनातील वास्तविक घटना.
या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!