काय म्हणता! सतत डोकेदुखीचा त्रास असण्यामागं असू शकतात ‘इतकी’ कारणं..

अलीकडच्या काळामधील बदललेल्या जीवनशैली, धावपळ आणि ताण-तणावामुळे डोकेदुखीच्या समस्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही समस्या किरकोळ स्वरूपाच्या असतात; पण जर का वेळीच त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, तर भविष्यामध्ये गंभीर आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो.

डोकं दुखू लागल्यास आपण प्रामुख्यानं घरगुती उपाय करतो, दुखणे जास्त असेल तर औषध घेतो. आणि दुखणे थांबले की आपण मात्र या समस्येला विसरतो; पण वारंवार डोकेदुखीची समस्या उद्भवणं हे मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे डोकेदुखीची नेमकी काय कारणे आहेत, हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.

WebMD (वेबएमडी) या मेडिकल वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, डोकेदुखीमागे तब्बल 150 प्रकारची कारणे असू शकतात..

मात्र त्यामधली प्रमुख कारणे कोणती आहेत हे पाहणे महत्त्वाचं आहे. कारण की पोस्ट ट्रॉमॅटिक डोकेदुखी सामान्य नसते.

पोस्ट ट्रॉमॅटिक

Headache डोकेदुखीच्या वेदना कोणत्याही प्रकारच्या दुखापती नंतर जाणवायला लागतात. दुखापत झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पोस्ट ट्रॉमॅटिकची डोकेदुखी जाणवू लागते. तेव्हा संबंधित व्यक्तीला स्मृतीशी संबंधित समस्या जाणवू शकते. तसंच, थकवा, चिडचिडेपणा, एकाग्रतेत अडचणी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ही डोकेदुखी काही आठवड्यांपर्यंत जाणवत राहते.

मायग्रेन (Migraine)

Headache मायग्रेन (Migraine):-अर्थात अर्धशिशीमुळे डोक्यात असह्य वेदना होतात. अशा प्रकारची डोकेदुखी काही तासांपासून काही दिवसांपर्यंत राहू शकते. `वेबएमडी`च्या माहितीनुसार, ही डोकेदुखीची समस्या महिन्याभरात खूप वेळा जाणवू शकते.

सरळ शब्दांत सांगायचं झालं, तर संबंधित व्यक्तीला 3 ते 4 वेळा या समस्येचा सामना करावा लागतो. याशिवाय मायग्रेनचा त्रास होताना रुग्णामध्ये अजूनही काही लक्षणं दिसून येतात. जसे की, तीव्र प्रकाश नकोसा वाटणं, आवाज सहन न होणं, उलट्या होणं आणि भीती वाटणं या लक्षणांचा यात समावेश आहे. मायग्रेनच्या त्रासामध्ये भूकसुद्धा लागत नाही आणि त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात.

ताण-तणाव

Headache बऱ्याचदा ताण तणावामुळेसुद्धा डोकेदुखीचा त्रास होतो. अशा प्रकारची डोकेदुखी सामान्यपणे बऱ्याच जणांना जाणवते. वृद्ध आणि तरुणांमध्ये सुद्धा ही समस्या दिसून येते. ताण-तणाव हे या डोकेदुखीचं प्रमुख कारण असून, यात अन्य कोणतीही लक्षणे दिसत नाही.

सायनस

Headache सायनसमुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास होतो. यामध्ये व्यक्तीच्या गालाची हाडे, कपाळा वर अथवा नाकाच्या वरच्या पृष्ठ-भागावर वेदना होतात. कपाळा-मध्ये आढळणाऱ्या पोकळीस सायनस असे म्हणतात.

त्यामध्ये सूज आल्यावर डोके दुखीचा त्रास होतो. या मध्ये डोकेदुखी सोबतच नाक वाहणं, कानामध्ये सर्दी साठणं, ताप, चेहऱ्यावर सूज या प्रकाराची लक्षणं दिसतात. सायनसच्या डोकेदुखीमध्ये नाकामधून कफ सारखा चिकट पदार्थ वाहत असून याचा रंग पिवळा किंवा फिकट हिरवा असतो.

क्लस्टर डोकेदुखी

काही वेळा डोकेदुखी विशिष्ट भागांमध्ये जाणवते. त्यामुळे तिला क्लस्टर डोकेदुखी असे म्हणतात. या वेदना एका दिवसात अनेक वेळा जाणवू शकतात. या वेदना असह्य आणि गंभीर स्वरूपाच्या असतात.

या दुखण्याच्या वेळी संबंधित व्यक्तीला डोळ्यांच्या अवती -भोवती तीव्र टोचल्यासारखं किंवा आग झाल्या सारखं जाणवतं. यामध्ये डोळे लाल होणं, कोरडे पडणं, डोळ्यांमधून सतत पाणी येणं, डोळ्यांतल्या बाहुल्यांचा आकार लहान होणं, अशी लक्षणंही दिसून येतात. तसेच, डोक्याच्या भागात वेदना होतात, त्या बाजूची नाकपुडी कोरडी पडते. ही डोकेदुखी दोन आठवड्यांपासून ते तीन महिन्यांपर्यंत राहू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!