Marriage Loan : लग्नासाठी पैसे नसेल तर आता EMI वर करा लग्न, ही आहे, ‘Marry Now, Pay Later’ फॅसिलिटी..

Marriage Loan do marriage wedding on EMI read Marry Now Pay Later facility तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे थाटामाटात आणि मोठ्या दिमाखात लग्न करणं, असे स्वप्न असेल. पण पैशांचा व वाढत्या महागाईचा विचार करता आपण एकेक गोष्टी टाळायला सुरुवात करतो आणि आपल्या खिशाला परवडेल तसं लग्न करतो. पण आता तुम्हाला तुमच्या स्वप्नांतलं आणि थाटामाटात लग्न करता येणार आहे. खरंतर आता तुम्ही लग्नासाठी (marriage lone) कर्ज घेऊ शकता.

लग्नासाठी तुमच्याकडे पुरेश पैसा नसेल तर तुम्ही आता EMI वर लग्न करू शकता. तुम्हाला वाटलं, हे कसं शक्य आहे? पण हे 100% सत्य आहे.

‘Marry Now, Pay Later’ फॅसिलिटीच्या साहाय्याने तुम्ही EMI वर लग्न करू शकता. आतापर्यंत तुम्ही EMI वर ऑनलाइन शॉपिंग, घर, सोने, गाडी किंवा वस्तू खरेदी केले असतील पण आता बाय नाऊ पे लेटर फॅसिलिटीमुळे तुम्ही EMI वर लग्नही करू शकता.

या कंपनीने ने सुरू केली Marry now, pay later सुविधा

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्ताप्रमाणे, फिनटेक कंपनी Sankash ने या सुविधेसाठी रॅडिसन हॉटेलशी करार केला आहे. येणाऱ्या काळात ही सुविधा संपूर्ण देशभरात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या सुविधेतील लग्नाचे स्थळ रेडिसन हॉटेलमध्ये उपलब्ध असून MNPL (Marry now,pay later) योजना देशभरात सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

Sankash कंपनीचे चे CEO आणि सह-संस्थापक आकाश दहिया यांच्या सांगण्याप्रमाणे आतापर्यंत त्यांच्याकडे Fly Now Pay Later होते. यानंतर Sell Now Pay Later आले. त्यांनी रॅडिसनच्या सहकार्याने Stay Now Pay Later ही सुविधा सुरू केली. त्यानंतर त्यांना या योजनेबद्दल विचार केला. किंबहुना, रेडिसनच्या उत्पन्नापैकी २० टक्के उत्पन्न अन्न आणि पेय यातून येते. यामध्ये लग्नसोहळ्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. कंपनीने हा प्लॅन दिल्ली-एनसीआरमध्ये लॉन्च केला होता. आता ते राजस्थान आणि मध्य प्रदेशातही उपलब्ध आहे.

या हॉटेल्समध्ये सुविधा उपलब्ध असणार

कंपनीच्या सांगण्यानुसार ही योजना देशभरात सुरू करण्याची योजना आखली जात असून या डिसेंबर अखेरीस ही सुविधा सर्व रॅडिसन हॉटेल्समध्ये उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंतचा कर्ज (marriage lone) घेऊ शकते. या कर्जासाठी त्यांना ६ ते १२ महिन्यांचा परतफेड कालावधी दिला जातो. हे कर्ज फक्त (marriage lone ) चार ते सहा तासांत मंजूर होतो. यानंतर, कंपनी ग्राहकांच्या नावावर रॅडिसनला पैसे देते. शिवाय या कर्जावर सहा महिन्यांपर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही. जर ग्राहकाने १२ महिन्यांचा परतफेड कालावधी निवडला तर मात्र त्याला दरमहा १ टक्के व्याज द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!