Mahajyoti Free Tab Yojana 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबतच रोज 6 GB डाटा सुद्धा….

Mahajyoti Free Tab Yojana 2023 : राज्यातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती, जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 साठी पुर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत असून महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. शिवाय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB per Day इंटरनेट डाटादेखील पुरविण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी पात्रता:
👉🏻 उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी.
👉🏻 उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी.
👉🏻 उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी.
👉🏻 जे विद्यार्थी 2023 मध्ये 10वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असून विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10वी चे प्रवेश पत्र व 9वी ची गुणपत्रिका जोडावी.
👉🏻 विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

📑आवश्यक कागदपत्रे:
➡️ 9 वी ची गुणपत्रिका
➡️ 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
➡️ आधार कार्ड
➡️ रहिवासी दाखला
➡️ जातीचे प्रमाणपत्र
➡️ वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

येथे व असा करा अर्ज
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाज्योती संस्थेच्या https://mahajyoti.org.in या वेबसाईटवर भेट द्या!

कसा करावा अर्ज.
1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MHT-CET JEE / NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

विद्यार्थ्यासाठी महत्त्वाच्या सूचना
महाज्योती तर्फे JEE/NEET/MHT-CET 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना टॅब व प्रशिक्षण देण्याकरिता नोंदणी अर्ज करताना काही विद्यार्थ्यांजवळ नॉन क्रिमीलेअर Non creamy, जात प्रमाणपत्र Caste certificate व रहिवासी दाखला Residence certificate नसल्यामुळे अर्ज भरतांना अडचणी येत आहेत असे काही विद्यार्थ्यांनी महाज्योतीला कळविले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दहावीची गुणपत्रिका ज्यावेळेस मागविण्यात येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर व अधिवास प्रमाणपत्र Residence Certificate अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी 15 मे 2023 त्यापूर्वी जाती प्रमाणपत्र, डोमेसाईल व जात प्रमाणपत्र तयार करावी.

सद्यस्थितीत खालील कागदपत्रां आधारे अर्ज करता येईल:
•फोटो Photo
•स्वाक्षरी Signature
•आधार कार्ड Aadhar Card
•९वी ची गुणपत्रिका • Mark sheet of 9th
•१० वी बोर्ड परीक्षेचं प्रवेशपत्र 10th Board Exam Admit Card

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Similar Posts