Tractor Anudan Yojana Maharashtra 2022 | ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 90 टक्के अनुदान, येथे करा अर्ज..

Tractor Anudan Yojana 2022: राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना अनेक योजना राबवत लाभ देत असते. शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करत, नुकसान सोसत शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा पैसा उभारावा लागतो. आर्थिक मदतीसंबंधी विविध शेतकरी अनेक योजनांचा लाभ घेऊन अनुदान किंवा आर्थिक मदत मिळवत असतात.

Tractor Anudan Yojana

आजही आम्ही तुम्हाला अशा योजनेबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होणार आहे. यासोबतच पैशांची जास्त बचतही होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच शेती करायला सोपी जाईल. (Tractor Anudan Yojana Maharashtra 2022)

शेतीतील खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळही शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा लागत नाही. त्यामुळे एक मोठी योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टर उपकरणांवर बाजारातील दरावर 90 टक्के अनुदान देणार आहे. (Tractor Yojana Maharashtra 2022)

शेती पद्धती आधुनिक करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून देशाची प्रगती होवो, म्हणून सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देत असते. यामध्ये शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर उपकरणांवर 90 टक्के सवलत मिळणार आहे. चला तर जाणून घेऊ या योजनेविषयी..

Tractor Anudan Yojana योजनेविषयी माहिती


या योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर योजना असं आहे. या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार घेऊ शकतात.‌ या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इतर साहित्य पुरवल्या जाईल. (Mini Tractor Anudan Yojana)

Tractor Anudan Yojana अटी व पात्रता


अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख रुपये एवढी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के (कमाल 3.15 लाख रुपये) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

येथे करा अर्ज..


मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. तसेच योजनेची माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल.

हे देखील वाचा-

click here abdnews

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!