Sarpanch Salary: महाराष्ट्रात सरपंचाला मिळतो तब्बल “एवढा” पगार! जाणून घ्या फक्त 5 मिनिटांत!

Sarpanch Salary: सरपंचला ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व प्राप्त झालं असल्याचं आपण सर्वच जाणतो. ग्रामपंचायतीचे प्रमुख पद म्हंटले तर सरपंच पद हे राजकीय दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे आहे. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो आणि आता तर सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाते. 3 जुलै 2017 रोजी मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतला असला तरी आता सरपंचाची निवड ही थेट जनतेद्वारे केली जाणार आहे.

सरपंचपदासाठी अनेकजण आपले नशीब आजमावतच असतात. यासोबतच या पदासाठी कितीही खर्च करण्याची तयारी देखील त्यांच्याद्वारे दर्शवली जाते. त्यामुळे सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर सरपंच झालेल्या व्यक्तीला शासनाकडून किती पगार (Sarpanch Salary) दिला जातो?, असा प्रश्न साहजिकच आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या मनात निर्माण होतच असेल. चला तर मग आजच्या आमच्या या लेखात आपण याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया.

सरकारच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा

किती असते Sarpanch Salary

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे 30 जुलै 2019 रोजी सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा आणि उपसरपंचांना वेतन लागू करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. पण त्याआधी सरपंचाला किती पगार मिळतो याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.

  • शून्य ते 2000 लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत-
    • यापूर्वी ही लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मासिक वेतन हे केवळ एक हजार रुपये होते. सोबतच यातील 75 टक्के वाटा शासनाकडून तर उर्वरित रक्कम ग्रामपंचायत स्वनिधीतून भरते.
  • 2001 ते 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पगार-
    • ही लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मासिक 1500 रुपये वेतन (Sarpanch Salary) दिले जाते.
  • 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पगार-
    • ही लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचे वेतन लोकसंख्येच्या प्रमाणाचा अंदाज घेता दरमहा 2000 रुपये असते.

सरकारच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा

30 जुलै 2019 रोजी महाराष्ट्रातील सरपंचांचे पगार वाढवून उपसरपंचांचे पगार सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. अर्थात अर्थमंत्री अजित पवार यांनी 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करताना सरपंचांच्या पगारात वाढ केली होती आणि उपसरपंचांचे वेतनही लागू केले गेले होते. शासनाच्या या नवीन निर्णयानुसार सरपंच व उपसरपंच यांना पुढील प्रकारे वेतन देण्यात येते.

  • शून्य ते 2000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांचे वेतन-
    • ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मासिक वेतन आता तीन हजार रुपये होणार आहे. तर, उपसरपंचांना दरमहा एक हजार रुपये वेतन मिळणार आहे. याठिकाणीही ग्रामपंचायत उर्वरित शासकीय पगाराच्या 75 टक्के रक्कम स्वत:च्या निधीतून देते.
  • 2001 ते 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती-
    • या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला मासिक चार हजार रुपये वेतन दिले जाते. तर उपसरपंचला १५०० रुपये वेतन दिले जाते.
  • 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती-
    • या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना 5000 रुपये मासिक वेतन दिले जाते, तर उपसरपंचांना 2000 रुपये वेतन दिले जाते.

सरकारच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!