PM Kisan Samman Nidhi : PM किसान योजनेचा हफ्ता मिळत नसेल तर Free मध्ये करा हे काम; लगेच मिळतील 6 हजार रुपये

PM Kisan Samman Nidhi : PM किसान योजना ही [PM Kisan Sanman Nidhi Yojana] शेतकऱ्याना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार तर्फे राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष 6000/- रुपये इतकी आर्थिक मदत DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते.

मात्र अनेक शेतकरी PM Kisan Sanman Nidhi या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तर शेतकऱ्यांना PM Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ का मिळत नाही? आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पर्याय आहे का? ही संपूर्ण माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

तुमचा PM Kisan Samman Nidhi चा हप्ता अडकलेला आहे का? किंवा तुम्हाला तुमचा पुढचा हप्ता मिळणार आहे की नाही? याबद्दल सर्व माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला PM Kisan Sanman Nidhi च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे..

PM Kisan Samman Nidhi चा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

  • PM Kisan Sanman Nidhi योजनेसंदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल अथवा तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर PM Kisan Sanman Nidhi ची अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुमच्या मोबाईल/कंप्युटरच्या स्क्रीनवर PM Kisan Samman Nidhi योजनेचे पेज ओपन होईल, आणि PM Kisan Samman Nidhi च्या या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे.
  • ही माहिती बघण्यासाठी अगोदर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला शेवटच्या पर्यायामध्ये “स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन फार्मर” असा पर्याय इंग्रजीमध्ये म्हणजेच Status of self Registered farmer दिसेल यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचं आधार नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून SEARCH या निळ्या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर एप्लीकेशन स्टेटस म्हणजेच संबंधित शेतकऱ्याच्या अर्जाची स्थिती बघायला मिळणार आहे.
  • लाभार्थ्याच्या अर्जामध्ये जर काही त्रुटि असल्यास या ठिकाणी लाभार्थ्याला ती चुकी लगेच कळवण्यात येईल.
  • आता आपल्याला या ठिकाणी परत बरेच पर्याय दिसतील या पर्यायापैकी तुम्हाला नो युवर स्टेटस (know your status) या पर्यायावर टच करायचे आहे.
  • आता या ठिकाणी परत तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन क्रमांक आणि कॅपच्या भरायचा आहे. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन क्रमांक असेल तर तुम्ही वरील नो युवर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावरण सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती करून घेऊ शकता.
  • या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही जो नंबर इ केवायसी करताना या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबर वर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी या पुढील चौकटीत टाका.
  • आता या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याची किंवा लाभार्थ्याची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल. याच पेजला थोडे खालीच स्क्रॉल करा थोडंच खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालील 3 पर्याय दिसतील
    • ELIGIBILITY STATUS
    • REASON OF INELIGIBILITY (IF ANY)
    • LATEST INSTALLMENTS DETAILS
  1. पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही अर्जाची पात्रता अर्जाची स्थिती बघू शकता जर या ठिकाणी काही चूक असेल तर ती दुरुस्त करा जर काही चूक नसेल तर पुढील पर्यायावर क्लिक करा.
  2. दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की जर हफ्ता मिळत नसेल आणि यासाठी काही कारण असेल तर ते कारण कोणता आहे आणि हफ्ता बंद होण्याची तारीख किती आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या दुसऱ्या पर्यायांमध्ये दाखवून देईल.
  3. तिसऱ्या पर्यायामध्ये जर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर या ठिकाणी ही संपूर्ण माहिती लाभार्थ्याला दाखवण्यात येईल या ठिकाणी कारण सुद्धा लाभार्थ्याला देण्यात येणार आहे की कोणत्या कारणामुळे लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून.

अशा पध्दतीने तुम्ही आपल्या पी.एम.किसान या योजनेचा लाभ घेतला आहे की नाही हे घरी बसून आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवरूदेखील माहिती घेऊन पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!