Peek vima yojana list 2024: अवकाळीचा पिक विमा मंजूर; या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विम्याचे पैसे…

Peek vima yojana list : जून-जुलै २०२३ या कालावधी दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसान भरपाई म्हणून मदत देण्याकरिता निधी वितरीत त्याच बरोबर अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत मालाचे नुकसान झाल्यावर पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच Input subsidy स्वरूपात एका हंगामामध्ये एक वेळेस यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दरानुसार मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

Peek vima yojana list

शासन निर्णय, महसूल आणि वन विभाग क्र. CLS – २०२२/प्र.क्र. ३४९/म-३, दि. २७/०३/२०२३ अन्वये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांबरोबरच इतर नुकसान बाधितांना मदत करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे.

विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर आणि अमरावती यांच्या तर्फे जून-जुलै २०२३ या कालावधी दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे दि. ३०/०८/२०२३ व दि. ३१/०८/२०२३ च्या पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.

काय आहे शासन निर्णय (Peek vima yojana list)

जून-जुलै २०२३ या कालावधी दरम्यान राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानकरिता बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भाधीन क्रमांक.१ मधील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एकूण १,०७,१७७.०१ लक्ष (अक्षरी रुपये एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष एक हजार) देण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!