Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024: आता 65 वर्षांच्या वृद्धांना मिळणार 3000/-! वयोश्री योजना काय आहे? अर्ज कसा करावा?

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024: केंद्र व राज्य शासनाकडून जनकल्याणाच्या उद्देशाने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व सामाजिक मदत करता येईल. मंत्रिमंडळ बैठकीत नवीन योजना सुरू करण्याबद्दलची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे, ही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या योजनेद्वारे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

जर तुम्ही देखील महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि तुम्हाला ही Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत 5 फेब्रुवारी 2024 रोजी Mukhyamantri Vayoshri Yojna सुरू करत असल्याची घोषणा केली होती. राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या मार्फत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सरकारतर्फे वर्षाला 3,000 रुपये दिले जाणार आहेत, आणि DBT द्वारे हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात येणार जाईल.

जेणेकरुन अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे वृद्धत्वामुळे नीट ऐकू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, ज्यांना चालण्यास त्रास होतो, या व अशा सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यास त्यांना मदत होईल. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे खरेदी करता येत नाहीत. मात्र आता या योजनेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय जीवन जगता येणार आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यात मदत करणार आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024ची माहिती

मुख्यमंत्री वयोश्री योजना
योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र
लाभार्थी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक
उद्दिष्ट वृद्धापकाळात आर्थिक पाठबळ देणे
आर्थिक सहाय्य रक्कम रु. 3,000
अर्थसंकल्पाची रक्कम 480 कोटी रुपये
राज्य महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट लवकरच लॉन्च होत आहे

480 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी 3,000 रुपये दिले जातील. ही योजना संपूर्ण राज्यात लागू करता येण्याच्या उद्देशाने या योजनेसाठी सरकारने 480 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र, ही योजना फक्त राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाणार आहे. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपणामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत मिळणाऱ्या उपकरणांची लिस्ट

महाराष्ट्र सरकार 3000 रुपयांची आर्थिक राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेची उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे. ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या गरजेनुसार उपकरणे खरेदी करू शकणार आहे. Mukhyamantri Vayoshri Yojna अंतर्गत दिल्या जाणाऱ्या उपकरणांची लिस्ट खालीलप्रमाणे आहे.

  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • कमरेसंबंधीचा पट्टा
  • फोल्डिंग वॉकर
  • ग्रीवा कॉलर
  • स्टिक व्हीलचेअर
  • कमोड खुर्ची
  • गुडघा ब्रेस
  • श्रवणयंत्र इ.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024चे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • Mukhyamantri Vayoshri Yojna ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली असून या योजने मार्फत ज्या नागरिकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशांना 3000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ घेता येणार आहे.
  • सरकारकडून थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये ही आर्थिक मदत रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.
    480 कोटी रुपयांचे बजेट यासाठी सरकारने तयार केले आहे.
  • Mukhyamantri Vayoshri Yojna चा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना मिळावा यासाठी ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
  • या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या समस्यांवर तोडगा काढू शकतात.
  • आता राज्यातील ज्येष्ठ नागरिक इतर कोणावरही अवलंबून न राहता त्यांच्या गरजा पूर्ण करू शकणार आहेत.
    ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात स्वावलंबी आणि चांगले जीवन जगण्यास ही योजना मदत करेल.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 साठी पात्रता

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने मूळ महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकच पात्र असतील.
  • 65 वर्षे किंवा त्याहून वय असलेले नागरिक यासाठी अर्ज करू शकतात.
  • या योजनेसाठी तेच अर्ज करू शकतात ज्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी असेल.
  • अर्जदाराला काही शारीरिक किंवा मानसिक त्रास असावा.
  • अर्जदाराचे आधार कार्डशी अर्जदाराचे बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील किमान 30 टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • स्वयं घोषणा प्रमाणपत्र
  • समस्येचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 साठी अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र, या योजनेमार्फत मिळणाऱ्या लाभांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही नागरिकाला अजून काही वेळ वाट बघावी लागणार आहे. नुकतीच मंत्रिमंडळाद्वारे या योजनेला मंजुरी मिळाली असल्याने येत्या काही दिवसातच ही योजना सुरू करण्यात येण्याची अपेक्षा आहे. ही योजना सरकारद्वारे लागू होताच आम्ही याबाबत अपडेट घेऊन येऊ, जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकता. सध्या ही योजना लागू होण्याची वाट पाहावी लागणार आहे. काही काळानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!