Download Voter ID: आता 5 मिनटात मोबाईलवर मिळवा वोटर आयडी, घरबसल्या असं करा डाऊनलोड..!

Download Voter ID : जेव्हाही तुम्ही कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी काम करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला निश्चितपणे अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासतच असते. अशा परिस्थितीत काही लोक ही कागदपत्रे आधीच तयार ठेवतात. उदाहरणार्थ, आजकाल आधार कार्ड घ्या किंवा पॅनकार्ड असेल, असे कागदपत्र जवळपास प्रत्येक कामासाठी आवश्यक झाले आहे. पण अशा स्थितीत अनेकजण वोटर आयडी कार्ड चे महत्व विसरले असून आता मतदान जवळ आल्यानंतर त्यांना या कार्ड ची गरज भासू लागली आहे.

मात्र अद्याप मतदार ओळखपत्र न बनवलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. बरेच लोक सरकारी कार्यालयात जाणे टाळण्यासाठी या कार्ड साठी अर्ज देखील करत नाहीत, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन वोटर आयडी बनवू शकता आणि ते तयार झाल्यावर तुमच्या पत्त्यावर सुद्धा पोहोचते. चला तर मग आता जाणून घेऊया की तुम्ही घरबसल्या वोटर आयडी कसे बनवून Download Voter ID करू शकता.

प्रत्येक भारतीयाला त्यांचा प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा आणि त्यासाठी मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मतदार ओळखपत्र गरजेचे आहे. मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठीची वयोमर्यादा 18 वर्षे आहे. तुमचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही मतदार कार्डासाठी अर्ज करू शकता आणि ते मिळवू शकता. मतदार कार्ड हे केवळ मतदानासाठी आवश्यक नसून ते नागरिकांचे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते.

या आशी मतदार कार्ड काढण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहून प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती, आणि ही प्रक्रिया केवळ निवडणुकीच्या वेळीच होत असे, मात्र आता ऑनलाइन अर्जाद्वारे वोटर आयडी साठी अर्ज करणे आणि वोटर आयडी कार्ड (Download Voter ID) अतिशय सोपे झाले आहे.

वोटर आयडी साठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? | How to Apply

नवीन मतदार ओळखपत्रासाठी, तुम्हाला ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतून जावे लागेल. नोंदणीसाठी, सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ती ओपन करावी लागेल. या सरकारी वेबसाइटवर देशातील निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती दिलेली आहे. यामध्ये देशभरातील आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्यांपासून ते निवडणुकीच्या वेळापत्रकापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. त्यात मतदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अर्जांचाही समावेश झाला आहे.

जर तुम्हाला नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला फॉर्म 6 निवडावा लागेल. हा फॉर्म शोधण्यासाठी, तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाइटच्या मेन पेज वरील राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल निवडावे लागेल. त्यांनतर नवीन मतदार ओळखपत्रासाठी, ‘राष्ट्रीय सेवा’ विभागांतर्गत ‘ऑनलाइन अर्ज करा’ वर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर ऑनलाइन अर्ज ओपन होईल.

वोटर आयडी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा | Apply Online for Voter ID

 • सगळ्यात आधी तुम्ही ECI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
 • त्यानंतर राष्ट्रीय मतदार सेवा या पोर्टलवर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला ‘Apply Online for registration of New Voter’ असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • विचारलेली सगळी माहिती योग्य प्रकारे भरा आणि आवश्यक सगळी कागदपत्रे अपलोड करा.
 • त्यानंतर ‘सबमिट’ ऑप्शन वर क्लिक करा.
 • हा अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ईमेल पाठवला जाईल. या ईमेलमध्ये पर्सनल व्होटर आयडी पेजची लिंक असेल, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकाल, महिन्याभरात तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र घरपोच मिळून जाईल.

वोटर आयडी कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Important Documents

 • स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • ओळखीचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा हायस्कूल मार्कशीट.
 • रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोन किंवा वीज बिल (पत्त्याचा पुरावा)

या काही ॲप्सच्या माध्यमातून मतदारांना या सुविधा मिळणार आहेत | Important Apps

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी मतदारांच्या सोयीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अनेक ऑनलाइन ॲप्सची माहिती दिली आहे. मतदारांची सोय लक्षात घेऊन हे ॲप लाँच करण्यात आले आहेत.

CVIGIL ॲप
या ॲपद्वारे मतदार निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवाराची तक्रार करू शकतात. तक्रार योग्य आढळल्यास उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर अवघ्या 100 मिनिटांत कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या ऑनलाइन प्रणालीद्वारे मतदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. जे मतदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघापासून दूर आहेत ते याद्वारे मतदान करू शकतात. तुमचे मत देताना, तुमच्या मोबाईलवर पिन कोड आणि ओटीपी तयार केला जाईल ज्यामुळे तुम्ही तुमचे मत सुरक्षित रित्या देऊ शकता.

या ॲपद्वारे दिव्यांग मतदार व्हील चेअरसाठी अर्ज करू शकतात आणि घरापासून मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा मिळवू शकतात. यासोबतच तुम्हाला नवीन नोंदणी, स्थलांतर इत्यादीसाठी विनंती करण्याची सुविधा देखील मिळू शकते.

वोटर आयडी डाऊनलोड कसे कराल? | how to Download Voter ID

डिजिटल Voter ID तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकशी जोडणे आवश्यक आहे. अशा वेळी वापरकर्त्यांना प्रथम KYC अपडेट करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला ई-व्होटर आयडी कार्ड डाउनलोड (Download Voter ID) करता येईल.

Download Voter ID करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

 1. स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाइट म्हणजेच https://eci.gov.in/e-epic/ या वेबसाईट वर क्लिक करावे लागेल.
 2. स्टेप 2: यानंतर तुम्ही Download e EPIC पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 3. स्टेप 3: त्यांनतर डाउनलोड e EPIC हे बटण या वेब पेजच्या खालच्या बाजूला उपलब्ध असेल.
 4. स्टेप 4: यानंतर तुम्हाला तुमचे लॉगिन डिटेल्स विचारले असतील तर ते द्यावे लागतील.
 5. स्टेप 5: नसल्यास, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरसह स्वतःची नोंदणी करावी लागेल.
 6. स्टेप 6: यानंतर तुम्हाला पोर्टलवरील डाउनलोड eEPIC या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
 7. स्टेप 7: यानंतर तुम्हाला तुमच्या Voter ID चा 10 अंकी युनिक EPIC नंबर टाकावा लागेल.
 8. स्टेप 8: या नंतर तुमच्या माहितीचे व्हेरिफिकेशन केले जाईल आणि त्यांनतर डिजिटल Voter ID तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
 9. स्टेप 9: यापुढे तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल, तो तुम्हाला वेरीफाय करावा लागेल.
 10. स्टेप 10: यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवर PDF फॉर्ममध्ये Download Voter ID करू शकाल.

वोटर आयडी मधे दुरुस्ती कशी करावी?

मतदार ओळखपत्रात ऑनलाइन दुरुस्ती करण्यासाठी, वोटर आयडी धारकाला प्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, परंतु केवळ त्याच व्यक्तीला ऑनलाइन दुरुस्तीचा लाभ घेता येईल, ज्यांचे नाव मतदार यादीत आधीच नोंदवलेले असेल. मतदार यादीत नाव न नोंदवल्यामुळे उमेदवाराला मतदार कार्डमध्ये ऑनलाइन दुरुस्ती करता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!