Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024: काय आहे पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना? या योजनेचे प्रकार किती? व्याजदर काय? नियम कोणते? जाणून घ्या सविस्तर!

Pradhan Mantri Mudra Loan Yojana (PMMY) अंतर्गत मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) कर्ज योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे व्यक्ती, SME आणि MSMEs यांना कर्ज प्रदान करण्यात येते. MUDRA योजने अंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण या 3 कर्ज योजना दिल्या जातात. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. मुद्रा कर्ज घेण्यासाठी, अर्जदाराला बँक किंवा कर्ज संस्थांकडे कोणतीही सिक्युरिटी जमा करण्याची गरज नाही, तसेच हे कर्ज ५ वर्षांमधे फेडता येते. Pradhan Mantri Mudra Loan Yojana

मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये | Features of Mudra Loan Yojana

  • मुद्रा कर्जाच्या प्रकारात मुदत कर्ज, वर्किंग कॅपिटल लोन आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा, या तीन प्रकारांचा समावेश होतो.
  • ही योजना शिशू, किशोर आणि तरुण यांसाठी उपलब्ध आहे.
  • या कर्जाची रक्कम
    • शिशु योजनेअंतर्गत: ₹50,000 पर्यंत,
    • किशोर योजनेअंतर्गत: ₹50,001 – ₹5,00,000 पर्यंत,
    • तरुण योजनेअंतर्गत: ₹5,00,001 – ₹10,00,000 पर्यंत आहे.
  • अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यवसायाच्या गरजेनुसार व्याजदर आकारला जातो.
  • या कर्जासाठी तारण किंवा सिक्युरिटी आवश्यक नाही
  • या कर्जाचा परतफेड कालावधी 12 महिने ते 5 वर्षे असून प्रक्रिया शुल्क शून्य किंवा मंजूर कर्ज रकमेच्या 0.50%, किंवा बँक/कर्ज देणाऱ्या संस्थेवर अवलंबून असेल.

मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा | How to Apply for Mudra Loan Yojana

मुद्रा कर्जासाठी अर्जाचा फॉर्म mudra.org.in या वेसाइटवर उपलब्ध आहे, तेथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता आणि सर्व आवश्यक माहिती भरून, ज्या बँकेतून तुम्हाला मुद्रा कर्ज घ्यायचे आहे, त्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि योग्यरित्या भरलेला अर्ज सबमिट करा. सोबतच तुम्हाला बँकेच्या इतर काही औपचारिकता देखील पूर्ण कराव्या लागतील. वेगवेगळ्या बँका/NBFC मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया थोडी वेग वेगळी असू शकते.

याशिवाय, तुम्ही बँक/कर्ज संस्थेने जारी केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह योग्य रीतीने भरलेला अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करून ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. एकदा बँक/कर्ज संस्थेने सबमिट केलेली कागदपत्रे बरोबर असल्याचे तपासले की तुमचे कर्ज मंजूर केले जाईल आणि कर्जाची रक्कम 7-10 कामकाजाच्या दिवसांत तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. Pradhan Mantri Mudra Yojana

मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Important Documents

  • पासपोर्ट आकाराच्या फोटोसोबत व्यवस्थित भरलेला अर्ज.
  • अर्जदार आणि सह-अर्जदारांची KYC कागदपत्रे, म्हणजेच, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, युटिलिटी बिल (पाणी/वीज बिल)
  • अर्जदार कोणत्याही विशेष प्रवर्गातील असल्यास, (म्हणजेच SC/ST/OBC/ किंवा अल्पसंख्याक असल्यास तर आवश्यक असल्यास त्याचा पुरावा गरजेचा आहे.
  • अर्जदाराचे शेवटच्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे गरजेचे आहे, तसेच आवश्यक असल्यास, स्थान, पत्ता आणि व्यवसाय किती वर्षांपासून सुरू आहे या साठीचा पुरावा असणे सुद्धा आवश्यक असणारं आहे.
  • बँक किंवा NBFC द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्र.

मुद्रा योजनेंतर्गत व्यवसायांची यादी | List of businesses under Mudra Loan Yojana

  • व्यावसायिक वाहने: मुद्रा फायनान्सचा वापर हा यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी म्हणजेच, ट्रॅक्टर, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली, माल वाहतूक वाहने, यांसारखी इतर व्यावसायिक वाहतूक वाहने खरेदी करण्यासाठी करता येऊ शकतो.
  • सेवा क्षेत्रातील उपक्रम: सलून, जिम, टेलरिंगची दुकाने, वैद्यकीय दुकाने, दुरुस्तीची दुकाने, ड्राय क्लीनिंग आणि फोटोकॉपी दुकाने इत्यादींचा व्यवसाय सुरू करणे.
  • अन्न आणि कापड उत्पादने क्षेत्रातील उपक्रम: पापड, लोणची, आइस्क्रीम, बिस्किटे, जॅम, जेली आणि मिठाई बनवणे, तसेच गावपातळीवर शेतीशी संबंधित उत्पादनांचे जतन करणे, यासारखे विविध उपक्रम या क्षेत्रात समाविष्ट आहेत.
  • व्यापारी आणि दुकानदारांना पुद्धील व्यावसायिक कामांसाठी कर्ज: दुकाने आणि सेवा उपक्रमांची स्थापना, व्यापार आणि व्यावसायिक कामं आणि उत्पन्न निर्माण करणारे बिगरशेती उपक्रम.
    • मायक्रो युनिट्ससाठी इक्विपमेंट फायनान्स स्कीम अंतर्गत कमाल रु 10 लाख पर्यंतचे कर्ज देण्यात येते.
  • कृषी संबंधित पुढील उपक्रमांना कर्ज देण्यात येते: कृषी चिकित्सालय आणि कृषी-व्यवसाय केंद्रे, अन्न आणि कृषी-प्रक्रिया युनिट, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, वर्गीकरण, पशुधन पालन, कृषी-उद्योग, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय इ.
  • बँका/NBFC द्वारे केवळ सेवा, व्यापार किंवा उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती, उपक्रम किंवा व्यवसायांना मुद्रा कर्ज देण्यात येते. Pradhan Mantri Mudra Yojana

मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका | Mudra Loan Yojana Banks

ॲक्सिस बँक, इंडियन बँक, बजाज फिनसर्व्ह, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, लेंडिंगकार्ट फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, सारस्वत बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, सिंडिकेट बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा कॅपिटल, IDFC फर्स्ट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, येस बँक.

महिलांना मुद्रा कर्ज कसे मिळेल? | How can women get Mudra Loan Yojana?

PMMY अंतर्गत मुद्रा योजनेद्वारे महिलांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. यासाठी, बँका, NBFC आणि मायक्रो फायनान्स संस्था (MFIs) महिला उद्योजकांना कमी व्याजदरावर तारणमुक्त व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देतात. महिला उद्योजकांसाठी मुद्रा योजनेंतर्गत कमाल 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येते, जी 5 वर्षांपर्यंत परत केली जाऊ शकते. महिलांसाठी मुद्रा कर्जासाठी असणारे पात्रता निकष हे व्यक्ती आणि उद्योगांसमानच आहेत. महिला उद्योजकांसाठी जी कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल त्या रकमेवर खूप कमी किंवा शून्य प्रोसेसिंग फी आकारली जाते.

मुद्रा कार्ड म्हणजे काय? | What is a Mudra card?

मुद्रा कार्ड हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे जे मुद्रा कर्जदारांना त्यांच्या व्यवसाय आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते. जेव्हा मुद्रा कर्ज मंजूर होते, त्यावेळी बँक/कर्ज देणाऱ्या संस्थाद्वारे कर्जदारासाठी मुद्रा कर्ज खाते उघडले जाते, सोबतच डेबिट कार्ड देखील दिले जाते. त्यांनतर कर्जाची असलेली रक्कम कर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते, जी ते त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार टप्प्यांमध्ये काढू शकतात. Pradhan Mantri Mudra Yojana.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!