Bharat Gas Online new connection: 1 तासात घरपोच गॅस कनेक्शन! भारत गॅसची नवीन योजना, जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Bharat Gas Online new connection: सध्या भारतातील सर्व घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस शेगडी असणे आवश्यक आहे कारण आता प्रत्येकांसाठीच गॅसच्या शेगडीवर अन्न शिजविणे अधिक सोयीस्कर झाले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे ते नवीन सिलिंडर सहज खरेदी करू शकतात, मात्र ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर याच कारणाने, आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला भारत गॅसच्या नवीन कनेक्शनसाठी ऑनलाइन (Bharat Gas Online new connection) अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरी बसून सुद्धा, भारत गॅससाठीचे नवीन कनेक्शन अगदी सहज मिळवू शकता, याबद्दल अधिक माहिती देणार आहोत. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

Bharat Gas Online new connection

डिजिटल इंडियाच्या या युगात भारत गॅसचे नवीन कनेक्शन (Bharat Gas Online new connection) घेण्यासाठी आता तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या भारत गॅस (BPCL) my.ebharatgas.com च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता.

भारत गॅसच्या नवीन गॅस कनेक्शनची किंमत सध्या वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळ्या सेवेनुसार 3000 ते 8000 रुपयांपर्यंत सुरू आहे.

Online Registration Process for New Connection of Bharat Gas:

 • भारत गॅसच्या नवीन कनेक्शनसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला सगळ्यात आधी भारत गॅसच्या अधिकृत वेबसाइट my.ebharatgas.com वर जावे लागेल.
 • आता तुम्हाला होम पेजवर “Register for LPG Connection” हा पर्याय दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
 • या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कनेक्शनचा प्रकार आणि राज्य आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल.
 • यापुढे तुम्ही शो लिस्ट या ऑप्शन वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सर्व वितरकांची नावे समोर आलेली दिसतील.
 • या नावांपैकी, तुम्हाला तुमच्या जवळचा वितरक कोण आहे ते तपासून योग्य वितरकावर क्लिक करावे लागेल आणि Continue बटणावर क्लिक करावे लागेल.
 • या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर, एक अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
 • आता तुम्हाला या अर्जामध्ये खालील माहिती द्यावी लागेल:-
  • वैयक्तिक माहिती
  • एलपीजी कनेक्शन / संपर्क माहितीसाठी पत्ता
  • इतर संबंधित तपशील
  • कॅश ट्रान्स्फर बाबतची माहिती
  • आणि इतर कागदपत्रे.
 • यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करून कॅप्चा कोड टाकावा लागेल.
 • कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी बटणावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला OTP टाकून सबमिट वर क्लिक करावे लागेल.
 • सबमिशन केल्यानंतर, रिक्वेस्ट आयडी क्रमांक तुमच्यासमोर येईल, तुम्हाला तो जपून ठेवावा लागेल किंवा तुम्ही त्याची प्रिंट देखील घेऊ शकता.
 • नंतर, तुम्ही या क्रमांकावरून अर्जाची प्रोसेस देखील तपासू शकता.
 • एकदा सबमिट केल्यानंतर, एजन्सी तुम्हाला 15 दिवसांच्या आत एक ईमेल पाठवेल. आणि यानंतर तुम्हाला एजन्सीमध्ये जाऊन तुमचे केवायसी पूर्ण करावे लागेल.
 • सर्व कागदपत्रे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला भारत गॅसचे नवीन कनेक्शन मिळेल.

Bharat Gas Online new connection Important Documents

नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला खालील काही कागदपत्रे एजन्सीकडे न्यावी लागतील:

 • आधार कार्ड
 • Request ID
 • राशन कार्ड
 • रहिवासी पुरावा/प्रमाणपत्र
 • बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया | Offline application process

 • ऑफलाइन मोडद्वारे भारत गॅसच्या नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जावे लागेल.
 • तुम्हाला वर नमूद केलेल्या कागदपत्रांसह कार्यालयात जाऊन अर्ज मागवावा लागेल.
 • आता या अर्जात मागितलेली सर्व माहिती द्यावी लागेल आणि संबंधित कागदपत्रे जोडावी लागतील.
 • आता हा फॉर्म तुम्हाला कार्यालयात जमा करावा लागेल.
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक कॉल येतो आणि त्यांनतर 4 ते 5 दिवसात त्वरित तुमच्या फॉर्म वर काम केले जाते.

एप्लिकेशन्स स्टेटस कसे तपासाल? | How to check applications status?

 • भारत गॅस नवीन कनेक्शनच्या (Bharat Gas Online new connection) अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला भारत गॅसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 • वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला “रजिस्टर फॉर एलपीजी कनेक्शन” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर, चेक स्टेटसची लिंक तुमच्यासमोर येईल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट आयडी आणि जन्मतारीख टाकावी लागेल आणि त्यानंतर जनरेट ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला OTP बॉक्समध्ये OTP टाकावा लागेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस दिसेल.

भारत गॅस नवीन कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे फायदे | Benefits of applying online

 • नवीन भारत गॅस कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज केल्याने बराच वेळ वाचतो.
 • संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने सर्व अर्ज प्रक्रिया लवकर केल्या जातात.
 • ऑनलाइन अर्ज करून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस देखील ऑनलाइनच तपासू शकता.
 • याच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही ऑफिस मधे जाण्याची गरज राहत नाही, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करू शकता.

Bharat Gas Online new connection Helpline number

आम्ही पुढे भारत गॅस मुख्यालयाचे काही आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत, हे नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मधे सेव्ह करून ठेवा कारण, भविष्यात जर तुम्हाला कधी गॅस एजन्सी ला कॉन्टॅक्ट करण्याची गरज लागली तर तुमच्याकडे आधीपासूनच नंबर असेल. Bharat Gas Online new connection

 • LPG मुख्यालय: ०२२-२२७१४५१६
 • पूर्व भारत: ०३३-२४२९३१९०
 • पश्चिम भारत: ०२२-२४४१७६००
 • दक्षिण भारत: ०४४-२६२१३९१४
 • उत्तर भारत: ०१२०-२४७४१६७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!