Bhu Naksha Online Download

Bhu Naksha Online Download : भू नकाशा ऑनलाइन डाऊनलोड कसा कराल? ते सुद्धा अवघ्या 5 मिनिटांत..

Bhu Naksha Online Download: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने जमिनीचे नकाशे किंवा प्लॉट रेकॉर्ड डिजीटल करण्यासाठी भू नकाशाची निर्मिती केली आहे. भू नकाशाचा उपयोग त्या नकाशांना पाहण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि डिजिटायझेशन करण्यासाठी केला जातो जे जमिनीच्या सीमा निश्चित करतात.

Bhu Naksha Online Download
Bhu Naksha Online Download

कोणत्याही जमिनीचा नकाशा हा अतिशय महत्त्वाचा असतो, मग ती शेतजमीन असो किंवा इतर कोणत्याही जमिनीचा तुकडा असो, ते सर्व नकाशे अतिशय उपयुक्त असतात आणि त्याची कागदपत्रे बरोबर असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

जोपर्यंत तुमच्याकडे तुमच्या जमिनीशी संबंधित संपूर्ण माहिती नसेल, तोपर्यंत तुम्ही त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार करू शकणार नाही, अशा परिस्थितीत सर्वप्रथम जमिनीचा नकाशा (Bhu Naksha Online Download) असणे महत्वाचे आहे आणि जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा? या बद्दल जाणून घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

असे असले तरीही अनेकांना जमिनीचा नकाशा कसा काढायचा? त्यासाठी कोणत्या सरकारी खात्याच्या पोर्टलला भेट द्यावी आणि त्या पेजवर जाऊन काय प्रोसेस आहे याबद्दल काहीच माहीत नसते.

या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही आमची पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की वाचा. Bhu Naksha Online Download

भू नकाशा म्हणजे काय? | What is Bhu Naksha?

भू नकाशा हा भारतीय कॅडस्ट्रल मॅपिंग सोल्यूशन आहे. हे जमिनीचे मॅपिंग आणि व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे जे जमिनीच्या नकाशांना डिजिटल रूपात सेव्ह करते. भू नकाशा म्हणजे, एका विशिष्ट जमिनीचा डिजिटलाइज्ड कॅडस्ट्रल नकाशा असून यामधे त्या त्या जमिनीचे स्थान, क्षेत्र आणि मालकीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली असते. भू नकाशा इंटरफेस प्रत्येक राज्यांमध्ये बदलतो.

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने भूखंडाच्या नोंदी डिजिटल करण्यासाठी भू नकाशाची निर्मिती केली आहे. भू नकाशाचा उपयोग प्लॉटच्या अचूक सीमा ठरवणारे नकाशे पाहण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि डिजिटायझेशन करण्यासाठी केला जातो. हे खरेदीदाराला प्लॉट खरेदी करण्यापूर्वी प्लॉट संदर्भात सविस्तर माहिती तपासण्यासाठी मदत करते. प्लॉट नकाशासह, इतर माहिती जसे की मालकाची माहिती, जमिनीच्या सीमा आणि जमीन वापराचा प्रकार याबद्दल अधिक माहिती याद्वारे मिळवता येते.

भूमी नकाशाचे डिजिटलायझेशन केल्याने फसवणूक आणि भ्रष्टाचार कमी झाला आहे. जमिनीच्या या सर्व नोंदी मोबाइल ॲपद्वारेही मिळवता येतात. भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन पारदर्शकता राखण्यात आणि राज्यातील जमीनिबद्दल चे वाद विवाद कमी करण्यात मदत झाली आहे. या लेखात, भू नकाशा, भू नकाशाचे फायदे आणि या संबंधित इतर माहिती अजून सविस्तर समजून घेऊया.

ऑनलाइन 2024 जमिनीचा नकाशा कसा पाहायचा? | Bhu Naksha online

 • Bhu Naksha Online Download करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याचे अधिकृत लँड मॅप वेब पोर्टल ओपन करा.
 • समोर आलेल्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे, तहसीलचे आणि गावाचे नाव निवडा.
 • गावाचे नाव निवडल्यानंतर स्क्रीनवर जमिनीचा नकाशा उघडेल.
 • नकाशात तुमच्या जमिनीचा खसरा क्रमांक निवडा.
 • खसरा क्रमांक निवडल्यानंतर त्या जमिनीचा तपशील स्क्रीनवर उघडेल.
 • येथे तुम्हाला Map Report हा पर्याय निवडायचा आहे.
 • नकाशा अहवाल पर्याय निवडताच, जमिनीचा नकाशा समोर येईल.
 • अशा प्रकारे तुम्ही हा नकाशा ऑनलाइन पाहू शकता.
 • भू नकाशा राज्यानुसार कसा डाउनलोड करावा?

महाराष्ट्राचा Bhu Naksha Online Download कण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा –

 • Download Bhu Naksha of Maharashtra
 • सगळ्यात आधी तुम्हाला महा भू नकाशा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
 • त्यांनतर तुम्हाला समोर ओपन झालेल्या पेजवर वर्ग, जिल्हा, तालुका, गाव इत्यादीची माहिती भरा. प्लॉट क्रमांक टाकूनही ही माहिती मिळवता येते.
 • जमिनीची किंवा प्लॉट ची माहिती मिळविण्यासाठी मॅप रिपोर्टवर क्लिक करा, तुम्हाला तुमच्या प्लॉटच्या नकाशा दिसून येईल.
 • हे नकाशे A0, A1 आणि A4 आकाराच्या कागदावर सहज छापले जाऊ शकतात.

Bhu Naksha Online Download करण्याचे फायदे

 • मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, खालील गोष्टींसाठी जमिनीची योग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे-
 • जमीन मालकाची पडताळणी – जमिनीच्या नकाशावर जमीन मालकाचे नाव आणि पत्ता योग्य आहे की नाही हे तपासणे
 • अभिलेखांचे एकत्रीकरण – ROR (अधिकारांचे रेकॉर्ड) आणि जमिनीचा नकाशा भू नकाशावर पाहता येईल. आरओआर हे एक कागदपत्र आहे ज्यामध्ये मालकाची माहिती, भाडे रेकॉर्ड, भाडेकरूची माहिती, देनिघेणी इत्यादी माहिती असते.
 • वेळेची बचत – भू नकाशा कोणीही कधीही पाहू शकतो कारण ते ऑनलाइन अपडेट केले जातात. त्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरजच संपली आहे.
 • भूखंडाचा आकार- भूखंडाच्या सीमा आणि आकार जमिनीच्या नकाशावर निश्चित केलेल्या आहे.
 • वैधता – जमीन विवादाची काही प्रकरणे आहेत का किंवा, भूखंड सरकारने सार्वजनिक कल्याणासाठी दिला आहे का, इत्यादी माहिती भू नकाशा द्वारे मिळू शकतात.

भू नकाशाच्या काही खास गोष्टी | Important features

भू नकाशाचा उपयोग प्लॉटच्या सीमा निश्चित करण्यासाठी केला जातो. भू नकाशात प्लॉटचे तपशील, जसे की मालकाची माहिती, वापराचा प्रकार अशा सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. हे जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन होण्यास मदत करते आणि जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता आणते. भू नकाशाचे अनेक फायदे आहेत, जसे की यामुळे वेळेची बचत होते, तसच यामुळे माहितीची पडताळणी आणि माहिती संकलित करण्यात मदत होते. भु नकाशाच्या वेबसाइट्स बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. Bhu Naksha Online Download

भारतातील सर्व राज्यांचे स्वतःचे स्वतंत्र भू नकाशा ऑनलाइन पोर्टल आहेत.

Similar Posts