Land Information Maharashtra | शेतीचा बांध कोरल्यास शिक्षा होणार, कायदा जाणून घ्या..

Land Information Maharashtra
Land Information Maharashtra

Land Information Maharashtra: शेतकऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन.. शेतजमीनाला असणारा बांध देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतीचा बांध.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेतीच्या बांधावरून वाद ठरलेला असतो.

Land Information शेतीच्या बांधावरून ठरलेला हा वाद कधी इतका विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात. अगदी खून करण्यापर्यंतही काहींची मजल जाते.. नि त्यातून कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातं असते.

अनेकवेळा असे होते की, ट्रॅक्टरने मशागत करताना नजरचुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो आणि यामुळे चांगलेच वाद पेटतात. एखाद्या शेतीचे पुर्वीचे वादविवाद आहेत किंवा कसे याबाबतची खात्री करूनच मशागत करावी, अन्यथा उद्भवणार्‍या प्रसंगामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.

Land Records शेतीचा बांध सांभाळण्याची जबाबदारी संबंधित जमीन मालकाची असते. इतर कोणी शेतीचा बांध कोरल्यास शेतकऱ्याला याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते. (Land Record Maharashtra)

Land Record जिल्हाधिकारी सदर प्रकरणाची चौकशी करतात. दोन्ही बाजू ऐकून त्याबद्दलचा निर्णय घेऊन शिक्षाही करू शकतात. गरज पडल्यास प्रत्यक्ष जागेवर जाऊन भूमापन करू शकतात‌. ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

शेतीचा बांध कोरल्यास वादविवाद करू नये कारण यासाठी कायदा आहे. कायद्याने गेल्यास कुणाचे नुकसान ही नाही होणार आणि न्याय देखील मिळून जाईल. यासाठी तुम्हाला कायदा माहिती असणं आवश्यक आहे. कायद्यात काय तरतूद आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘येथे क्लिक करा’ बटणावर क्लिक करा.

कायदा काय सांगतो पहा..
Land Record महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्यामध्ये शेतीच्या ‘सीमा व चिन्हे’ असे नववे प्रकरण आहे. त्यात शेतीच्या सीमा निश्चित करणे, त्याबद्दलच्या वादाचे निराकरण करण्याबाबतचा उल्लेख आहे.

Land Record Maharashtra कोणत्याही शेतीच्या सीमा रेषेबाबत वाद निर्माण झाल्यास, संबंधिताना पुरावा सादर करण्याची संधी देऊन जिल्हाधिकारी त्यात दुरुस्ती करू शकतात. शेतीच्या सीमा रेषेबाबत कायदा असा सांगतो.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!