caste validity certificate online 2023: घरबसल्या ऑनलाईन काढा जात वैधता प्रमाणपत्र; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

caste validity certificate online : अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्याकरिता विविध शैक्षणिक संस्थांकडून जातीच्या दाखल्या बरोबर जात वैधता प्रमाणपत्राची देखील मागणी करण्यात येते.

caste validity certificate online

शिवाय संबंधित प्रवर्गामधील व्यक्तींना निवडणूक लढण्याकरिता किंवा शासकीय नोकरीकरीता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.

दिनांक 01 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठीची अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. लक्षात ठेवा जात वैधता प्रमाणपत्र हे राखीव जागांकरिता म्हणजेच शिक्षण, निवडणूक, सेवा या कारणांसाठीच घेता येते.

जात वैधता प्रमाणपत्र का लागते?

जात वैधता प्रमाणपत्र केवळ तीन कामासाठीच काढता येते.

१) विद्यार्थी/शिक्षण – शाळकरी विद्यार्थ्यांना 12 वी नंतर महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी अथवा महाविद्यालय मध्ये शिष्यवृत्ती मिळण्याकरिता.
२) नोकरी/सरकारी नोकरी – सरकारी नोकरी मिळत असल्यास आरक्षित जागेचा लाभ घ्यावयाचा असल्यास.
३) उमेदवारी/निवडणूक – निवडणुकीमध्ये राखीव जागेवर उभे राहण्यासाठी उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.

म्हणूनच या प्रवर्गामधील व्यक्तींनी जातीचा दाखला मिळाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त (caste validity certificate online) काढून घेणे गरजेचे आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली असून सदरील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा झालेली आहे.

असा करावा ऑनलाईन अर्ज (caste validity certificate online)

जात वैधता प्रमाणपत्र हे एक महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आहे. भारतातील मोजकेच राज्य जात प्रमाणपत्र ऑनलाइनअर्ज करण्याची प्रक्रियेस मान्यता देतात. जात वैधता प्रमाणपत्रासाठी नमूद करण्यात आलेल्या पद्धतीनेच अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ अथवा प्रमाणित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडणे गरजेचे असते .

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ : https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php हे आहे.

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागपत्रे पुढीलप्रमाणे;

 • संबंधित कॉलेजचे पत्र आणि चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
 • अर्जावर संबंधित महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलची स्वाक्षरी, शिक्का
 • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
 • अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला आणि पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा
 • अर्जदाराचा जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत (caste validity certificate online)
 • अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला, त्यांचा पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा आणि त्यांचा जातीचा दाखला, अर्जदाराचे वडील निरक्षर असल्यास ते निरक्षर असल्याचे शपथपत्र
 • अर्जदाराची आत्या आणि काकाने शाळा सोडल्याचा दाखला
 • अर्जदाराचे आजोबा अथवा चुलत आजोबांनी शाळा सोडल्याचा दाखला
 • इतर महसुली पुरावे – जसे कि, गाव नमूना, सात-बारा, घराची टॅक्स पावती, घराचे खरेदीखत, आठ अ, फेरफार उतारा, मालमत्तापत्रक, गहाणखत
 • अर्जदारची वंशावळ
 • तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र बरोबरच फॉर्म नं. १७ (शपथपत्र).

सर्वांत महत्वाच्या गोष्टी…

 • ‘एससी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यानी जात वैधता प्रमाणपत्राकरिता 10 ऑगस्ट 1950 च्या आगोदारचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
 • ‘व्हीजेएनटी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता दिनांक 21 नोव्हेंबर 1961 च्या आगोदारचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
 • ‘ओबीसी’ आणि ‘एसबीसी’ संवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राकरिता दिनांक 13 ऑक्टोबर 1967 च्या आगोदारचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. (caste validity certificate online)

जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आयडीचे व्हेरिफिकेशन
 • अर्जदारचा आधार कार्ड
 • अर्जदारचे मतदार कार्ड, पॅन कार्ड व मनरेगा कार्ड
 • अर्जदारचे अँड्रेस प्रूफ
 • अर्जदारचे मतदार आयडी नंबर
 • अर्जदारचे ड्रायव्हिंग लायसन्स
 • अर्जदारचे पासपोर्ट
 • अर्जदारचे किंवा त्याच्या वडिलांचे लाईट बिल, फोन व पाण्याचे बिल
 • अर्जदार भाड्याने राहत असल्यास भाड्याची पावती
 • अर्जदारचे रेशन कार्ड
 • अर्जदारचे जातीचे प्रमाणपत्र
 • अर्जदाराच्या, त्याच्या वडिलांच्या अथवा त्याच्या नातेवाईकाच्या जन्माच्या दाखल्याचा नोंदी
 • अर्जदारच्या स्वतःच्या किंवा रक्तातील नातेवाईकाच्या जातीचा पुरावा
 • अर्जदाराच्या वडिलांच्या अथवा अन्य नातेवाईकाच्या सरकारी सेवाच्या रेकॉर्डमधील जातिचा किंवा समुदायाची नोंदीचा उल्लेखिचा उतारा. (caste validity certificate online)
 • अर्जदाराच्या प्राथमिक शाळेत असल्याची नोंद.
 • स्थानिक ग्रामपंचायत मधून कढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • जात अधिसूचनेच्या तारखेपूर्वी जात आणि नेहमीच्या निवासस्थानासंबंधी कागदोपत्री पुरावा.

Similar Posts