PM Awas Yojana list 2023 : मोदी सरकारचा मोठा निर्णय; घर बांधण्यासाठी ह्या लोकांना मिळणार पैसे? पहा पात्रता व मिळणारी रक्कम..

PM Awas Yojana list 2023 : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. (PM Awas Yojana) आज आपण या लेखामध्ये पीएम आवास योजना बद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

PM Awas Yojana list 2023

प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana list 2023) ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती तेही ज्या लोकांकडे त्यांची स्वतःची घरे नाहीत त्या लोकांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. सध्या आपल्या केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवलेला असून तो आता डिसेंबर 2024 पर्यंत गेलेला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची जिल्हयानुसार यादी पाहा

पीएम आवास योजना ही भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी व गोरगरिबांना आर्थिक दृष्ट्या सहाय्य देण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना असे आहे. (PM Awas Yojana). या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून एक लाख वीस हजार रुपये पर्यंत दिले जातात.

या योजनेची पात्रता काय आहे? (PM Awas Yojana list 2023)

  • ज्यांच्याकडे स्वतःचे कायमस्वरूपी पक्के घर नाही असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल आणि त्यांच्याजवळ कायमस्वरूपी पक्के घर नसेल तर त्यांना घर मिळणार नाही (PM Awas Yojana list 2023).
  • अर्जदार व्यक्ति हा भारतीय नागरिक असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीच्या स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कोणतेही कायमस्वरूपी पक्के घर नसले पाहिजे.
  • कमी उत्पन्न गटातील (LIG) लोकांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपये ते सहा लाख रुपये यांच्या दरम्यान असावे.
  • मध्यम उत्पन्न गटातील (MIG 1)लोकांचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपये ते 12 लाख रुपये याच्या दरम्यान असावे.
  • मध्यम उत्पन्न गटातील (MIG 2) लोकांचे वार्षिक उत्पन्न हे 12 लाख रुपये ते 18 लाख रुपये याच्या दरम्यान असावे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे आलेले नवीन अपडेट

तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे (PM Awas Yojana list 2023). की आता तुम्हाला जमिनीच्या नोंदणी शिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी तुमच्या जमिनीची नोंदणी करावी लागेल.

PM Awas Yojana list 2023

सर्व अर्जदारांनी या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या योजनेस पात्र आहात की नाही हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमची सर्व महिन्यात ही वाया जाईल आणि तुमचा अर्ज हा रद्द केला जाईल (PM Awas Yojana list 2023). योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी ही प्रसिद्ध केली जाते व त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाते आणि लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे दिले जातात.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा

१) या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही याच्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या.

२) तेथे तुम्हाला मेनू बटन दिसेल त्यावरती क्लिक करा.

३) ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे सिटीजन असेसमेंट हा पर्याय दिसेल त्या पर्याय वरती क्लिक करा.

४) आता तुमचा आधार कार्ड नंबर त्यावरती टाका.

५) या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्ही थेट अप्लिकेशन पेज वरती जाल त्या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती भरा.

६) माहितीची पुष्टी केल्यानंतर पुढे जा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळेल.

७) त्यानंतर अर्ज सुद्धा डाऊनलोड करा.

८) आवश्यक कागदपत्रांसह हा अर्ज घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जावा आणि कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज सबमिट करा.

PM Awas Yojana list 2023

तुम्हाला राज्यनिहाय प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना यादी 2023 तपासायची असेल, तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आणि नंतर नवीन पेजवर तुमचा जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा, त्यानंतर कॅप्चा टाका. एंटर करा आणि क्लिक करा. खाली दिलेल्या सबमिट बटणावर. यानंतर तुमच्या गावाची घरांची यादी तुमच्यासमोर येईल.

प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana list 2023) कशी काम करते?

योग्यरित्या समजून घेण्यासाठी एक उदाहरणः

समजा तुम्ही MIG-II श्रेणीत आला आहात (म्हणजे तुमचे एकूण कौटुंबिक उत्पन्न रु. 12-18 लाख दरम्यान आहे). तुम्ही 50 लाख रुपयांचे घर घेण्याचा विचार करत आहात. तुमचे किमान डाउन पेमेंट 20% असेल, म्हणजे रु. 10 लाख आणि तुम्ही उर्वरित 40 लाख रुपये कर्जाद्वारे भरू शकता.

तथापि, PMAY 2022 अंतर्गत, MIG-2 श्रेणीतील अर्जदार 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% सबसिडीसाठी पात्र आहेत. त्यामुळे, 28 लाख रुपयांच्या उर्वरित कर्जाच्या रकमेसाठी, तुम्हाला नियमित (विनाअनुदानित) व्याजदर सावकाराला भरावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!