HDFC Parivartan Scholarship 2023 : HDFC बँक पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देणार 75 हजार रुपयांची स्कॉलरशीप..

उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असणाऱ्या (HDFC Parivartan Scholarship 2023) होतकरु विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. HDFC बँकेने 2023-2024 या वर्षाकरिता पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

HDFC Parivartan Scholarship 2023

इयत्ता पहिली पासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून HDFC Parivartan Scholarship 2023 स्कॉलरशिपसाठी अर्ज मागवण्यात आले असून या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची पात्रता, स्कॉलरशिपची रक्कम, आणि त्यासाठी करावी लागणारी अर्ज प्रक्रिया याविषयीची सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत…

join whatsapp group

‘एचडीएफसी बँक परिवर्तन योजने’च्या अंतर्गत स्कॉलरशिपसाठी अर्ज करणारे विद्यार्थी हे इयत्ता पहिली पासून ते बारावी आणि सर्व शाखांसोबत डिप्लोमा व आयटीआय अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी, याबरोबरच पदवी, पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे सर्व गरजू विद्यार्थी या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेवू शकतात.

HDFC Parivartan Scholarship 2023 विद्यार्थ्यांची पात्रता खालीलप्रमाणे

  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये अथवा इयत्तेमध्ये 55 % किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह पास झालेले असणे आवश्यक आहे.
  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या करणार्‍या विद्यार्थ्याचे मागच्या वर्षाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणारा विद्यार्थी हा भारतातील रहिवाशी असणे गरजेचे आहे.

एवढी रक्कम मिळणार – (HDFC Scholarship 2023-24)

विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिपची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे. इयत्ता व अभ्यासक्रमांप्रमाणे मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम खालीलप्रमाणे आहे.

1) पदव्युत्तर पदवी ( जनरल)- ३५ हजार रुपये
2) पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल )- ७५ हजार रुपये
3) पदवी ( जनरल)- ३० हजार रुपये
4) पदवी ( प्रोफेशनल)- २५ ते ५० हजार रुपये
5) आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा- १८ हजार रुपये
6) इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत- १८ हजार रुपये
7) इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत- १५ हजार रुपये

HHDFC Parivartan Scholarship 2023 साठी आवश्यक कागदपत्रे –

1. विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईज फोटो
2. विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक (HDFC Scholarship 2023-2024)
3. विद्यार्थ्याचे आधार कार्ड/मतदान कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना, चालू शैक्षणिक वर्षाचे (२०२३-२४ चे) शाळा/महाविद्यालयाचे ओळखपत्र
4. विद्यार्थ्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फीस पावती
5. विद्यार्थीच्या पालकांचा उत्पनाचा दाखला.

HDFC Scholarship 2023-2024 साठी असा करा ऑनलाईन अर्ज –

पात्र विद्यार्थ्यांना HDFC Bank Parivartan’s ECSS Programच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

तुमची मुलं कोठे जातात? काय करतात? जाणून घ्या त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून

HDFC Scholarship 2023-2024 शिष्यवृत्ती बाबतच्या अधिक माहितीसाठी बरोबरच शिष्यवृतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता CLICK करावे – CLICK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!