Used Car Auction : आता फक्त 1 लाखात खरेदी करा कार आणि 20 हजारात स्कूटी! जाणून घ्या सविस्तर!
Used Car Auction: सध्याच्या परिस्थितीत लोकांना परवडणाऱ्या किमतीत कार घेणे कठीण होत आहे. पण आता तुमच्यासाठी परवडणाऱ्या किमतीत कार आणि मोटरसायकल खरेदी करण्याची अनोखी संधी चालून आली आहे. कार 24, olx, कार देखो या सारख्या ब्रँडने या मार्केटमध्ये खूप मोठी मजल मारली आहे. नवीन कार घेणेही दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. या समस्येला कंटाळून लोकांनी जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
बँका जे लोकं कर्जावर गाडी घेऊन त्या कर्जाची परतफेड परत नाही करत त्यांच्या गाड्या जप्त करून त्यांचा लिलाव करतात. अनेक महागडी वाहने आता लिलावात कमी किमतीत विकली जातात. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही या वाहनांची माहिती घेऊन Used Car Auctionच्या लिलावामधे सहभाग घेऊ शकता.
नवीन कार किंवा चांगली बाईक घेण्याचे आजकाल प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि हौस म्हणून अनेक जण खिशात पैसे नसले तरी कार किंवा मोटरसायकल खरेदी करत असतात. अशावेळी कारसाठी लागणारी आर्थिक मदत ते बँकेकडून घेतात. असे केल्याने त्यांची अशी स्वप्ने सत्यात उतरतात हे कितीही खरे असले तरी पण कार किंवा मोटरसायकल खरेदी केल्यानंतर काही महिन्यांनी बँकेत दर महिन्याला हप्ते भरणे आवश्यक असते. काही लोक काही वर्षे हप्ते भरतात आणि नंतर आर्थिक अडचणीत येतात. अशावेळी हे हप्ते न भरल्यास, बँक आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी वाहन जप्त करून त्यांचा लिलाव म्हणजेच Used Car Auction करते
बँकेने ओढून आणलेल्या गाड्यांचा तुम्हाला काय फायदा होतो?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेने ओढून आणलेली कार म्हणजेच Used Car Auction मध्ये वाहन घेण्याचे अनेक फायदे आहेत. यामधे चांगल्या कार आणि मोटारसायकल अतिशय परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येतात. तसेच, तुम्हाला नोंदणी आणि इतर कागदपत्रांबाबत कोणतीही अडचण येत नाही. बँक वाहन खरेदीदारांना कार आणि मोटारसायकलशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे प्रदान करते
इतक्या स्वस्त गाड्या येतात कुठून? | Used Car Auction
अनेकदा चांगला CIBIL स्कोअर असलेले लोक बँकांकडून कर्ज घेतात, पण काही बँका, अशा काही लोकांना कर्ज देत नाहीत. अशावेळी असे बरेच लोक वित्तीय कंपन्यांकडून जसे की बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स, सुंदरम फायनान्स लिमिटेड, टीएसएम कार्स, टोयोटा ट्रस्ट, चोलामंडलम, महानिद्रा फायनान्सिंग ई. कर्ज घेतात. जर तुमच्याकडे वाहन खरेदीच्या वेळी पूर्ण रक्कम नसेल परंतु तुम्हाला दर महिन्याला बँकेला हप्ते भरावे लागतात. मात्र जे लोक हे ईएमआय वेळेवर भरत नाहीत, त्यांची कार किंवा जी काही मालमत्ता असेल ती बँकेद्वारे जप्त केली जाते.
बँकेच्या लिलावात कार कशी खरेदी करावी| How to buy car in bank auction?
अनेकदा लोक बँकांकडून कार किंवा गृहकर्ज तर घेतात परंतु कर्जाची परतफेड करणं त्यांच्यांने शक्य होत नाही, आणि याच कारणाने बँकेद्वारे लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता जप्त केल्या जातात. बँका नंतर या गाड्या विकून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या गाड्यांचा लिलाव आयोजित करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक महागड्या गाड्या अतिशय स्वस्तात मिळू शकतात. वाहनाच्या लिलावात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला बँकेमार्फत लिलावाच्या मदतीने कार किंवा घर घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधावा. यामागील कारण म्हणजे असे की अनेक बँकांमध्ये वाहन जप्ती किंवा लिलाव विभाग आहे जे मालमत्ता किंवा बँकेने ताब्यात घेतलेल्या वाहनांची विक्री करत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही याठिकाणी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बोली सुद्धा लावू शकता.
हा लिलाव कुठे होत आहे? | Where is this Car Auction taking place
हा लिलाव इंडस इझीव्हील्सच्या वेबसाइटवर होणार आहे. परवडणाऱ्या किमतीत कार आणि मोटारसायकलसह सुमारे 107 वाहनांचा सध्या लिलाव या ठिकाणी होणार आहे. यासोबतच मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहित असले पाहिजे की Indus EasyWheels हे इंडसइंड बँकेने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी सुरू केलेले व्यासपीठ आहे. वेबसाइटवर तुम्ही लिलावासाठी ऑफर केलेल्या सायकल, स्कूटर किंवा कारबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि या ठिकाणी तुम्ही तुमची बोली सुद्धा लावू शकता.
या लिलावासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला induseasywheels.indusind.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. याशिवाय, या साईट वर तुम्ही बँकेने जप्त केलेल्या इतर गाड्यांची माहिती देखील पाहू शकता. या शिवाय तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही हवी असणारी माहिती मिळवू शकता.