राशीभविष्य : 20 एप्रिल 2024, शनिवार

20 एप्रिल, मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. तर वृषभ राशीच्या लोकांना सहकारी मदत करतील.कन्या राशीने आज प्रत्येक विषयात सावध रहावे तर तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल.धनू राशीच्या जातकांनी नव्या संधी ओळखाव्यात तर कुंभ राशीच्या लोकांनी सावध आणि सतर्क राहा. तुमची राशी आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत काय सांगते? चला जाणून घेऊया सर्व राशींसाठी शनिवार कसा असेल?

मेष : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. दुपार नंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. कुटुंब, आप्तेष्ट व कामाच्या ठिकाणी संबंधातील सौहार्दता टिकून राहण्यासाठी स्फूर्ती व उत्साह ह्यात संतुलन ठेवावे लागेल.

वृषभ : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.

मिथुन : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपार नंतर थोडे सावध राहावयास लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.

कर्क : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.

सिंह : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.

कन्या : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.

तूळ : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपार नंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत.

वृश्चिक : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार – व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण – घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल. वाहनसौख्य लाभेल.

धनू : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल.

मकर : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत.

कुंभ : 20 एप्रिल 2024 शनिवार च्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील.

मीन : 20 एप्रिल 2024 शनिवारच्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!