मुलांवर ‘असे’ करा संस्कार; कोणीच त्यांना प्रगतीपासून रोखू शकणार नाही..!- चाणक्य नीति

आचार्य चाणक्य..! एक महान अर्थतज्ज्ञ अन् रणनीतिकार..! चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली, ज्याला ‘चाणक्य नीति’ म्हणून ओळखलं जातं. मानवी जीवनामधील यशाचे स्त्रोत या नीतिशास्रामध्ये आहे.. नीतिशास्त्राद्वारे आचार्य चाणक्यांनी त्यावेळी केलेले मार्गदर्शन आजच्या अत्याधुनिक काळात सुद्धा लागू होते.

आचार्य चाणक्यांनी मुलांच्या संगोपनावर सुद्धा विशेष लक्ष वेधलं. पालकांनी आपल्या अपत्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी, त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नये यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत ‘चाणक्य नीति’मध्ये काय मार्गदर्शन केलंय जाणून घ्या..

चाणक्य यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलंय. आचार्य चाणक्य स्वतः तक्षशिला विश्वविद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. याच काळामध्ये चाणक्यांनी मुलांचे पालनपोषण करताना पाळावयाचे नियम सांगितले आहेत. त्याबाबत जाणून घेऊ या..

असे करा मुलांचे संगोपन..

👉🏻 मुलांना लहान वयामध्येच त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव करुन द्यायला पाहिजे. लहान वयामध्ये मुलांवर केलेले संस्कार शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहतात. याच काळामध्ये लहान मुलांना वाईट सवयी सुद्धा लागू शकतात. त्यामुळे पालकांनी नेहमी जागृत राहायला हवं.

👉🏻 लहान वयामध्ये मुलांना खोटं बोलण्याची घातक सवय लागू शकते. त्यामुळे नेहमी मुलांना या सवयीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

👉🏻 मुलांना मेहनतीने यश मिळवण्याची सवय लावायला पाहिजे. मेहनत केल्यामुळे मिळवलेलं यश किती आनंद देते याची माहिती मुलांना लहान वयातच द्यावी. ज्यामुळे ते सुद्धा मेहनतीने आणि कठोर परिश्रमाने यश मिळवण्याचा प्रयत्न करतील.

👉🏻 लहानपणातच मुलांना शिस्तीचे धडे गिरवावे. जसे की सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, वेळेमध्ये अभ्यास करणे, स्वतःची कामं स्वतः करणे, अशा सवयी मुलांना बालपणात लागल्या तर त्यांना आयुष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो.

👉🏻 बालपणी आई-वडिलांचा हात धरून मूलं चालत असले, तरी मोठे झाल्यावर त्याला पंख पसरून जगामध्ये उडावं लागतं. त्यामुळे वेळीच मुलांना या चांगल्या सवयी लावायला पाहिजेत.

👉🏻 मुलांना लागलेल्या वाईट गोष्टी त्यांच्या प्रगातीमध्ये अडथळा आणतात. त्यांना आलेल्या संकटांना तोंड देत असताना, त्यांची साथ दिली, तर योग्य वयात दिलेले संस्कार त्यांना अडचणीतून बाहेर काढतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!