Milk Price Hike: दूधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; अमुक आणि मदर डेअरीने पाच महिन्यांत दुसऱ्यांदा केली दरवाढ..

महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. काल अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ (Amul and Mother Dairy increase milk prices) जाहीर केली आहे. दोन्ही ब्रँडच्या दुधाच्या नवीन किमती १७ ऑगस्ट २०२२ पासून लागू झालेल्या आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने सांगितले की, अमूल ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या दुधाच्या किमतीत ४ टक्क्यांनी वाढ (Milk price increased by 4 percent) केली जात आहे. यानंतर काही वेळातच मदर डेअरीनेही आपल्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सांगितले की, अमूल ब्रँडच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अमूल गोल्डच्या ५०० मिली पॅकेटची किंमत ३१ रुपये असेल. त्याच वेळी, अमूल ताझाचे ५०० मिली पॅकेट २५ रुपयांना आणि अमूल शक्ती २८ रुपयांना विक्री करण्यात येईल.

का वाढवले दुधाचे दर..
महासंघाने वाढत्या महागाईच्या तुलनेत लिटरमागे २ रुपये वाढ खूपच कमी असल्याचे म्हटले आहे. आता गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबईसह अनेक राज्यांतील ग्राहकांना दुधासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या दोन्ही कंपन्यांकडून यंदाची ही दुसरी भाडेवाढ आहे.

दरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टी असो की दुष्काळ त्यामुळे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा जास्त फायदा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk producer farmers) चांगले दिवस येत आहेत. कारण तीन महिन्यांपूर्वी सुद्धा दुधाच्या दरामध्ये वाढ झाली होती.

राज्य दूध उत्पादक व प्रक्रियाकारक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, (State Milk Producers and Processors Welfare Association Secretary) ”महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दूध व्यावसायिकांची बुधवारी (ता. १७ ऑगस्ट) संध्याकाळी झूम मिटिंग घेण्यात आली. यात डिझेल, पॅकेजिंग मटेरियल आणि विजदरामधील झालेली वाढ लक्षात घेता दूध विक्रीचे भाव २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!