अखेर औरंगाबाद पोलिसांकडून ‘या’ अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

सभेच्या परवानगीचे पत्र आज आयोजकांकडे देण्यात येणार असून आता १ मे २०२२ रोजी होणाऱ्या सभेचा मार्ग मोकळा होणार आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येणार असली तरी राज ठाकरे यांना काही अटी-शर्तीचे पालन करावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी पाळाव्या लागतील ‘या’ अटी :

▪️ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागेल.
▪️लहान मुलं, महिला, वृद्ध नागरिक हे सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी लागेल.
▪️इतर धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल.
▪️सभेदरम्यान कोणत्याही प्राण्याचा वापर करणे निषिद्ध आहे.
▪️१ मे रोजी महाराष्ट्र दिवस असल्यामुळे धर्म, जात, प्रांत, वंश यावरून वक्तव्य करू नये.

महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट? धुळ्यात सापडल्या ८९ तलवारी; भाजपाचा गंभीर आरोप

▪️कोणत्याही व्यक्ती अथवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
▪️सभेच्या ठिकाणी कसलेही असभ्य वर्तन करू नये.
▪️वाहन पार्किंगचे सर्व नियम पाळावे लागणार.
▪️सभेपूर्वी आणि सभेनंतर वाहन रॅली किंवा मिरवणूकीची परवानगी नाही.
▪️सभेत आलेल्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणे-करून सामाजिक वातावरण बिघडेल.
▪️सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.

बाळा नांदगावकर यांनी सभास्थळी भेट दिली

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हेही बुधवारी औरंगाबादला जाऊन राज ठाकरेंच्या १ तारखेच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी केली, तिथे त्यांनी राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांचीही भेट घेतली. पोलिस त्यांच्या सभेला नक्कीच परवानगी देतील, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता.

सभेच्या ठिकाणी बॅनर

मनसे कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हे होर्डिंग्ज दिसतात. शहरातील निराला बाजार परिसरातील मुख्य चौकातही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर लिहिले आहे, ‘राजतिलक की करो तैयारी आ रहे हैं भगवाधारी’

मनसे कडून सभेची जोरदार तयारी सुरू

Similar Posts