जालन्यामध्ये ८९ अवैध तलवारी जप्त; राज्यामध्ये मोठ्या घातपाताचा संशय..

धुळे पोलिसांनी मुंबई – आग्रा महामार्गावरून संशयास्पदरीत्या जात असलेल्या पांढरा कलर असलेली स्कॉर्पिओ MH-09-CM 0015 चा पाठलाग करून सोनगीर पोलिसांच्या दलाने एक खंजीर आणि ८९ तलवारी जप्त केल्या आहेत.

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठी दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे भाजप नेते राम कदम यांचे म्हणणे आहे.

या तलवारी राजस्थानमधील चित्तोडगडहून जालना शहरात आणल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सोनगीर पोलिसांनी जालना शहरातील चंदणझिरा परिसरात राहणाऱ्या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अवैध शस्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी कोणी आणि कशासाठी मागवली, याचा तपास पोलिस करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणलेल्या या शस्त्रांचा वापर मोठ्या घातपातासाठी केला जाणार होता का? अशी शंका सोनगीर पोलिसांनी व्यक्त करून प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.

धुळे येथील सोनगीर पोलिसांनी या प्रकरणात जालना शहरामधील चंदणझिरा परिसरामध्ये राहणाऱ्या मोहंमद शरीफ मोहंमद शफिक, शेख इलियास शेख लतिख, सय्यद नईम सय्यद रहीम, चालक कपिल विष्णू दाभाडे या 4 आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच यापूर्वी सुद्धा या चारही आरोपींविरुद्ध जालना शहरात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तलवारींवर ‘सिरोही की तलवार’ असा मार्क आणि वॉरंटी ३० वर्षे असा उल्लेख आल्याने या तलवारी सिरोही चित्तोडगड येथून आणल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी सुद्धा जालना शहरात पोलिसांनी १९ तलवारी जप्त केल्या केल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद तलवारीच्या साठ्याप्रकरणी जालन्यातील दोन तरुणांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या शस्त्रसाठ्याचे जालना कनेक्शन समोर येत असल्याने शहरात एकच खबळ उडालीय.

औरंगाबाद शहरामध्ये राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एवढा मोठा शस्त्रसाठा नेमका जालन्यात कशासाठी आणला जात होता? या मागे काही कट तर नाही ना.? असा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!