WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपची जबरदस्त ट्रिक! समोरच्याने डिलीट केलेला मॅसेजही वाचता येणार….

WhatsApp Deleted Message recover : व्हॉट्सॲपमध्ये असे कितीतरी जबरदस्त फीचर्स आहेत, ज्याबद्दल आपल्यापैकी खूप जणांना माहित नसतं. बऱ्याचवेळा व्हॉट्सॲपवर छोट्या ट्रिक्स वापरुनही नव-नवीन गोष्टी करता येतात, आज अशीच एक जबरदस्त ट्रिक बद्दल जाणून घ्या, तुम्हाला काही सोप्या स्टेप्स वापरून डिलीट केलेला मॅसेज सुद्धा वाचता येईल..

WhatsApp Tricks and Tips : पूर्वी फक्त एक मेसेंजर असणारं व्हॉट्सॲप आता फार महत्वाचं ॲप बनलं आहे. प्रत्येकजण याचा वापर फक्त एकमेकांशी चॅट करण्यासाठीच नाही तर व्यवसायमध्येसुद्धा whatsapp चा वापर करत आहेत. ज्यामुळे कोट्यवधी भारतीय व्हॉट्सॲप वापरत असून चॅटिंगबरोबरच फोटो/व्हिडीओ पाठवण्यापासून ते व्हिडीओ कॉलिंगसाठीही याचा वापर करतात.

अनेकजण व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या ट्रिक्सही वापरत असून एक अशीच भन्नाट ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. समजा जर कोणी तुम्हाला मेसेज करून तुम्ही वाचायच्या आधीच त्याने तो डिलीट केला तर तुम्ही सोपी ट्रिक वापरुन तो मेसेज वाचू शकता, चला तर मग जाणून घ्या या भन्नाट ट्रिकबद्दल.. Read Delete WhatsApp Message

सर्वात पहिले तूम्हाला एक थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल. ज्याचं नाव आहे “WhatsDelete: Recover Deleted Messages”. हे ॲप्लिकेशन इंस्टॉल केल्यानंतर, तुम्हाला त्या ॲपला सर्व परमिशन द्याव्या लागतील. जेणेकरून हे application व्यवस्थित काम करू शकेल.

असे वापरा हे ॲप्लिकेशन..
◆ हे ॲप्लिकेशन इंस्टॉल केल्यावर तुम्हाला व्हॉट्सॲपवर पुढीलप्रमाणे सेटिंग्ज कराव्या लागतील.
◆ सर्वात आधी WhatsApp उघडा आणि वरच्या बाजूस असणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करा.
नंतर सेटिंग्जवर जा आणि डेटा आणि स्टोरेज वापरावर टॅप करा.
◆ त्यानंतर मीडिया ऑटो डाउनलोड क्लिक करा आणि सर्व पर्यायांना परमिशन द्या.
◆ त्यानंतर जर कोणी तुम्हाला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप पाठवून ती डिलीट करत असेल, तर त्यानंतर तुम्हाला “WhatsDelete: Recover Deleted Messages”. ॲप उघडावे लागेल जे तुम्ही डाउनलोड केलेले आहे.
◆ व्हॉट्सॲप डिलीट ॲप उघडल्यानंतरच तुम्हाला डिलीट केलेला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ दिसेल.

(टीप: लक्षात ठेवा की सुरक्षिततेच्या दृष्टीने थर्ड पार्टी application वापरणे अयोग्य आहे. तरी देखील तुम्ही हे application वापरत असाल तर त्याचा वापर तुमच्या जबाबदारीने करावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!