FASTag मधून दुप्पट पैसे कट झाल्यास येथे करा तक्रार..!

15 जानेवारी 2021 पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल भरण्यासाठी FASTag अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग नसलेल्या कोणत्याही वाहनाला मोठा दंड आकारला जाईल. मात्र, दुचाकी वाहनांना फास्टॅगमधून सूट देण्यात आली आहे. FASTag लागू झाल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, टोलनाक्यावरील फास्टॅगवरून वाहनाचे दुप्पट शुल्क वजा केल्यास काय करायचे? असे होणेही शक्य असल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितले आहे की, जर FASTag मधून दोनदा पैसे कट झाले तर आपण, ज्या बँकेकडून FASTag खरेदी केला आहे त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करावा, म्हणजेच बँक आपली तक्रार नोंदवून घेईल आणि पडताळणीनंतर, व्यवहाराचे पैसे आपल्या FASTag खात्यावर परत करेल, तक्रार केल्यानंतरही तुमचे पैसे परत केले नाहीत तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे.

हा आहे दुसरा पर्याय..

● बँकेकडे तक्रार नोंदवल्यानंतर तुमचे पैसे परत न झाल्यास तुम्ही NPCI कडे संपर्क साधू शकता. तक्रारीमध्ये, तुम्हाला काही माहिती NPCI (National Payments Corporation of India) ला द्यावी लागेल.
● माहितीसाठी, तुम्हाला VRN (वाहन नोंदणी क्रमांक, वाहन क्रमांक), टोल प्लाझाचे नाव, प्लाझा शहर आणि प्रवासाची तारीख द्यावी लागेल.
● जर तुमचा व्यवहार अनेक वेळा अयशस्वी झाला असेल, तर तुम्हाला NPCI कडे वेगळी तक्रार करावी लागेल.
● NPCI ने तक्रार करण्यासाठी @FASTag_NETC हे ट्विटर हँडल दिले आहे, जिथे तुम्ही संपूर्ण बोलू शकता.
● मात्र ठरवलेल्या कालावधीत पैसे परत न मिळाल्यास बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार नोंदवा..

FASTag जारी करणारे बँक आणि त्यांचे टोल फ्री नंबर.

SBI Bank – 18002669970

● ICICI Bank – 18602100104

● Equitas Bank – 18004191996

● HDFC Bank – 18001201243

● Axis Bank – 18001035577

● Kotak Mahindra Bank – 18002666888

● IDFC Bank – 18002669970

● Panjab Natioanl Bank – 08067295310

● Paytm – 18001026480

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!