नागाचे चुंबन घेत व्हिडिओ बनवणे सर्पमित्राला पडले महागात, गुन्हा दाखल….!

सांगली : जीवघेणा स्टंट करून विषारी नागाचा चुंबन घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील सर्पमित्र प्रदीप अशोक अडसुळे याने नागाचा चुंबन घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे या सर्पमित्र प्रदिपवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे हा सर्पमित्र नाग आणि साप पकडून त्याचे चुंबन घेताना व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत होता. त्यामुळे तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाग पकडून त्याच्यासोबत चुंबन घेतानाचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

वनविभागाने केली कारवाई

सदरील कारवाई विजय माने उपवनसंरक्षक सांगली, डॉ. अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा, सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर व अमोल साठे वनरक्षक बावची व निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

‘असला जीवघेणे स्टंट कोणीही करू नये

अशाप्रकारे जीवघेणे स्टंट कोणीही करू नये, असे आवाहन वनविभागाने केले असून नागाला अथवा सापाला इजा पोहोचेल असे कृत्य केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही वन विभागाने म्हटले.

पाहा व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!