वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवा सेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल
वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवासेनेच्या दोन गटांत तुफान मारामारी झाली आहे. औरंगाबाद मधील संत एकनाथ सभागृहाबाहेर युवासेनेचे दोन्ही गट आपआपसात भिडले.
मनपाच्या आगामी निवडणुकीची रणनिती बद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी वरुण सरदेसाई औरंगाबाद शहरात आले आहेत. वरुण सरदेसाई यांनी शहरातील संत एकनाथ सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, वरुण सरदेसाई सभागृहातून बाहेर पडताच युवा सेनेच्या दोन गटांत भयंकर राडा झाला.
संत एकनाथ सभागृहातून सर्वांचं मार्गदर्शन झाल्यानंतर प्रमुख पदाधिकारी निघून गेल्यावर जेव्हा कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडत होते. त्यावेळी एकमेकांना धक्का दोन्ही गटात वाद होऊन वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांत भयंकर हाणामारी झाली. या हाणामारीत एकमेकांचे कपडे सुद्धा फाडण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.