राज ठाकरेंच्या तिसऱ्या सभेचा टीझर मनसे कडून समोर; तर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी न देण्याची भारतीय दलीत पँथरची मागणी.
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून १ मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू असताना मराठवाडा सांस्कृतीक मंडळ बुक करण्यात आले आहे. आणि सभेला परवानगी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त यांच्याकडे आज अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला असतानाच या सभेला विरोध दर्शवत भारतीय दलीत पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सभेला परवानगी नाकारण्याबाबतचा अर्ज पोलीस आयुक्तांना दिला आहे.
औरंगाबाद शहरामध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नका, राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती व्यक्त करत भारतीय दलीत पँथर ने राज ठाकरेंच्या सभेला विरोध दर्शवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा निमित्त झलेल्या मेळाव्यापासून पक्षबांधणीसाठी सभा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिवाजी पार्क सभेच्या नंतर ठाण्यात आणि आता येणाऱ्या १ मे रोजी ते औरंगाबाद शहरात मोठी सभा घेणार आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कारण देऊन भारतीय दलीत पँथर ने या सभेला परवानगी देवू नये अशी भूमिका घेतली आहे.
आ रहें हैं भगवाधारी…