औरंगाबादमध्ये वऱ्हाडी मंडळींना नाचण्यासाठी आणला चक्क चालता फिरता लग्न मंडप !

औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथून एक वरात निघाली, बॅण्डच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचत होती, उन्हाचा पारा सुद्धा चढला होता. मात्र अश्या भर उन्हात वऱ्हाडी मंडळी मात्र सावलीत नाचत आणि चालत होती. वऱ्हाडी मंडळीच्या डोक्यावर चक्क मंडप चालत होता.

या भन्नाट दृश्याने क्रांती चौकातून येणाऱ्या -जाणाऱ्या नागरीकांच्या नजरा वरातीकडे वळत होत्या. आणि या चालत्या फिरत्या मंडपाची काही जण मोबाईल मध्ये शूटिंग सुद्धा करत होते.

औरंगाबाद शहरामधील एका लग्न सोहळ्याच्या वरतीसाठी खास करून मध्यप्रदेश येथील इंदूर शहरामधून एक चालता फिरता मंडप आणण्यात आला होता. या मंडपाला चारही बाजूने चाके लावण्यात आली होती, हा मंडप पुढे नेण्यासाठी कामगार ही सुद्धा होते, इतक्या भर उन्हामध्ये अंगाची लाही होण्याच्या धाकाने कुणी बाहेर पडण्याची हिंमत करत नसतानाच लग्नातील वऱ्हाडी मंडळी मात्र या मनसोक्त पणे नाचत होती. बॅण्ड पथक सुद्धा मंडपा सोबत सावलीमध्ये बंद वाजवत होते.

शहरामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा चालता फिरता मंडप वरतीसाठी आणल्याने सोशल मीडिया वर सुध्दा या मंडपच्या चर्चाना उधाण आले आहे. वऱ्हाडा सॊबत चालणाऱ्या या मंडपाने सर्वातचं लक्ष वेधून घेतलं होतं. क्रांती चौकाकडून ही वरात उस्मानपुऱ्याकडे गेली.

पाहा चालत्या फिरत्या मंडपाचा व्हिडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!