Voting Slip Download : Voting Slip घरी न आल्यास घरबसल्या मोबाईलवर करता येईल डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया..

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुककरता रणधुमाळी सुरू असून अशातच बुथ अधिकारी गावातल्या/वार्डातल्या घरोघरी जाऊन Voting Slipचे वाटप करत आहेत. जेणेकरून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. पण काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच तुम्ही ऑनलाइन किंवा एका एसएमएसच्या माध्यमातूनही वोटर स्लिप मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया …

Voting Slip शिवाय सुद्धा करता येईल मतदान

Voter Slip नसल्यास तुम्ही तुमच्या मतदान कार्ड दाखवून सुद्धा मतदान करू शकता. Voter Slip मिळवण्यासाठी मतदार मदत केंद्राला भेट देऊन ती मिळवू शकता.

Voter Slip अशी करा डाउनलोड

  • सर्वप्रथम अँन्ड्रॉईड फोनच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन तेथे Voter Helpline हे अ‍ॅप डाउनलोड करा.
  • आता मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड भरून लॉगइन करा.
  • national voters service portal वर रजिस्टर करा.
  • EPIC क्रमांक सर्च केल्यानंतर वोटर स्लिप दाखवली जाईल ती डाउनलोड करा.

SMS च्या माध्यमातून मिळवा तुमच्या मतदान केंद्राची माहिती

तुमच्या मोबाइलच्या टेक्स मेसेजमध्ये ECI नंतर स्पेस देऊन तुमच्या मतदान कार्डवरील असलेले क्रमांक लिहून 1950 या क्रमांकावर मेसेज पाठवल्यावर फक्त 14 सेकेंदामध्ये मतदान केंद्राची माहिती तुम्हाला मिळेल.

वोटर स्लिपशिवाय कसे मतदान करू शकतो?

जर तुमचे नाव मतदार यादीत नही आणि तुमच्याजवळ वोटर स्लिप सुद्धा नही तरीसुद्धा तुम्ही मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करू शकता. निवडणूक आयोगाने 12 ओखळपत्रांच्या माध्यमातून मतदान करण्यास परवानगी दिली आहे.

  1. पारपत्र (पासपोर्ट),
  2. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
  3. केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,
  4. बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,
  5. पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड,
  6. मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,
  7. निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
  8. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,
  9. आधार कार्ड,
  10. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र,
  11. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 
  12. पॅन कार्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!