Ladli Laxmi Yojana: मुलींना मिळणार 1,43,000 रुपये, सरकारची नवी योजना, अशा प्रकारे करावा लागणार अर्ज!

Ladli Laxmi Yojana: मित्रांनो अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या कुटुंबात जर मुलीचा जन्म झाला तर त्यांच्यासाठी ती चिंतेची बाब असते. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आता सरकार द्वारे अशी एक योजना लागू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत तुमच्या मुलीला तिच्या जन्मापासून ते तिचे लग्न होईपर्यंत सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत. लाडली लक्ष्मी योजना असे या योजनेचे नाव असून, या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नापर्यंतचा प्रत्येक प्रकारचा खर्च हा सरकार मार्फतच केला जाणार आहे.

Ladli Laxmi Yojana
Ladli Laxmi Yojana

मुलीच्या जन्मानंतर तिच्या बद्दल सकारात्मक विचार करावा, ती कुटुंबावर ओझे बनू नये, लिंग गुणोत्तरात सुधारणा व्हावी, आणि सोबतच मुलीच्या शैक्षणिक वाटचालीत सुधारणा व्हावी, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून Ladli Laxmi Yojana योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे मुलीच्या आरोग्याच्या स्थितीत सुधारणा होण्यात सुद्धा मदत होणार आहे.

सरकारद्वारे ही योजना 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व मुलींसाठी लागू केली जात असून, या योजनेसाठी अर्ज करणारी सर्व कुटुंबे मध्य प्रदेश राज्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. याशिवाय मुलीचे पालक देखील टॅक्स भरणारे नसावेत. यासोबतच, ज्या कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुले असतील किंवा आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असेल, अशा कुटुंबात या मुलींच्या जन्मानंतरच्या 5 वर्षांपर्यंत त्यांची नोंदणी करता येईल. याशिवाय ज्या पालकांना दोन किंवा त्यापेक्षा कमी मुले आहेत आणि त्यांनी दुस-या मुलाच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा पर्याय अवलंबला आहे, असे पालक या योजनेसाठी पात्र आहेत

लाडली लक्ष्मी योजनेच्या (Ladli Laxmi Yojana) वतीने सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना शासनाकडून पात्र ठरविण्यात आले आहे. याशिवाय इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा कोणत्याही प्रवर्गातील लोक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. पात्र असणारी सर्व कुटुंबे या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी आकारली जाणार नाही.

जर तुम्हालाही Ladli Laxmi Yojana साठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे मुलीच्या पालकांचा फोटो, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, स्थानिक मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, मुलीचा जन्म दाखला आणि मुलीचे लसीकरण कार्ड असणे गरजेचे असणार आहे. कारण ही सर्व कागदपत्रे असणारे कुटुंबच या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

शासनाकडून या योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्व मुलींना 1,43,000 रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामधे मुलीने 6वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यावर सर्व प्रथम मुलीला 2000 दिले जातील, त्यानंतर इयत्ता 9वी मध्ये प्रवेश घेतल्यावर 4000 दिले जातील, त्याचप्रमाणे इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर 6000 दिले जातील, 12वीला प्रवेश घेतल्यावर तिला 6000 रुपये दिले जातील, त्यानंतर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर त्या मुलीला 25000 रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल. त्यानंतर, ज्यावेळी मुलीला वयाची 21 वर्षे पूर्ण होतील तेव्हा तिला सरकारकडून 100000 दिले जातील.

Ladli Laxmi Yojana Application process

Ladli Laxmi Yojanaचा लाभ घेण्यासाठी पात्र कुटुंबांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी, आम्ही आमच्या आजच्या या लेखात ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची डायरेक्ट लिंक खाली देत आहोत, या लिंक द्वारे तुम्ही या योजनेसाठी तुमच्या मोबाइलवरून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात. जर (https://ladlilaxmi.mp.gov.in/llyhome.aspx) तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल किंवा काही समस्या येत असेल तर तुम्ही जवळच्या लोकसेवा केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हा ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करू शकता.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!